IPL 2026 : वैभव सूर्यवंशी विरुद्धचे आक्रमक वर्तन जेमिसनला भोवले, बीसीसीआयकडून कारवाई

जयपूर : राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज काईल जेमिसनवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कारवाई केली आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर १ मे रोजी झालेल्या सामन्यानंतर, न्यूझीलंडचा हा वेगवान गोलंदाज आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळला. वैभव सूर्यवंशीला बाद केल्यानंतर जेमिसनने तीव्र प्रतिक्रिया दिली आणि त्याला आक्रमकपणे 'सेंड-ऑफ' दिला. याच कारणास्तव बीसीसीआयने या न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजावर कारवाई केली.



आयपीएलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जेमिसनने क्रिकेटपटू आणि संघ अधिकाऱ्यांसाठी असलेल्या आयपीएल आचारसंहितेच्या स्तर १ चे उल्लंघन केले आहे. सामन्यादरम्यान भाषा, कृती किंवा हावभावांद्वारे दुसऱ्या खेळाडूला आक्रमक प्रतिक्रिया देण्यास प्रवृत्त करण्याशी संबंधित असलेल्या कलम २.५ चे उल्लंघन केल्याबद्दल तो दोषी आढळला. जेमिसनला एक डिमेरिट पॉइंट आणि एक ताकिद देण्यात आली. सामनाधिकारी राजीव सेठ यांच्यासमोर काईल जेमिसनने आपला गुन्हा आणि शिक्षा मान्य केली.



जेमिसनचे आक्रमक वर्तन राजस्थानच्या डावातील दुसऱ्या षटकात घडले. सूर्यवंशीने खेळलेल्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. पण, पुढच्याच चेंडूवर जेमिसनने एक जोरदार यॉर्कर टाकून त्याला त्रिफळाचीत केले. त्यानंतर त्याने आक्रमकपणे जल्लोष केला. असे करताना तो सतत सूर्यवंशीकडे पाहत होता आणि त्याच्या अगदी जवळही गेला होता.


राजस्थानविरुद्धच्या सामन्यात जेमिसनला मिळालेले एकमेव यश सूर्यवंशीमुळे मिळाले. त्याने चार षटके गोलंदाजी करत ४८ धावा दिल्या. या मोसमातील आयपीएलमधील हा त्याचा केवळ दुसराच सामना होता. यापूर्वी, त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्ध खेळताना तीन षटकांत ४२ धावा दिल्या होत्या.

Comments
Add Comment

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील

अजिंक्य रहाणेची नवी इनिंग सुरू होणार

मुंबई : भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे आता खेळाडू म्हणून नव्हे, तर समालोचकाच्या नव्या भूमिकेत

Cristiano Ronaldo Marriage : अखेर रोनाल्डोने जॉर्जिनासोबत थाटला संसार! 10 वर्षांच्या प्रेमकहाणीला लग्नाची सुंदर किनार

फुटबॉलविश्वातील दिग्गज स्टार क्रिस्टियानो रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. रोनाल्डोने

IND vs AFG: भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर; दिल्लीत रंगणार सामना

भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात लवकरच एका रोमांचक टी-20 मालिकेचे आयोजन केले जाणार आहे. या मालिकेची चाहते

Abishek Porel : क्रिकेटपटू अभिषेक पोरेल हुगळीत अटक; कथित बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू आणि बंगालचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेल याला हुगळी येथे एका कथित बलात्कार प्रकरणात