HSC Rajapur Result 2026 : राजापूरची झळाळती कामगिरी! ‘धवल यश’ परंपरा कायम”

राजापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) तर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, राजापूर तालुक्याने पुन्हा एकदा आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. यंदा तालुक्याचा एकूण निकाल ९४.९८ टक्के लागला आहे.


या परीक्षेसाठी एकूण १२०२ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी तब्बल ११९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गुणवत्तेनुसार पाहता,


६६ विद्यार्थी विशेष गुणवत्ता श्रेणीत
२२० विद्यार्थी प्रथम श्रेणीत
५६८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत
२८२ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.



१००% निकाल देणारी महाविद्यालये:


जैतापूर, कशेळी, कोंडये, मूर, देवाचे गोठणे, शासकीय तंत्रनिकेतन आणि कुंभवडे या कनिष्ठ महाविद्यालयांनी शंभर टक्के निकालाची कामगिरी करत विशेष ठसा उमटवला आहे.



इतर महाविद्यालयांचा निकाल:


राजापूर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय – ९५.६०%
पाचल – ९६.४२%
वाटूळ – ९३.९३%
ओणी – ९४.२३%
नवजीवन, राजापूर – ९३.४१%
आडिवरे – ९४.६४%
जानशी – ८३.७२%
नाटे – ८८.८८%
नॅशनल महाविद्यालय – ९३.०२%


या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी, शिक्षकवृंद, पालक तसेच संस्थांचे पदाधिकारी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



शैक्षणिक क्षेत्रात राजापूरचा दबदबा कायम :


दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्कृष्ट निकाल देत राजापूर तालुक्याने कोकणातील शैक्षणिक दर्जा पुन्हा अधोरेखित केला आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचे पाठबळ यामुळे हा यशाचा टक्का गाठता आला, असे शिक्षण क्षेत्रातून सांगितले जात आहे.


एकूणच, या निकालामुळे राजापूर तालुक्याने ‘धवल यश’ाची परंपरा कायम ठेवत पुन्हा एकदा आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे.

Comments
Add Comment

donkey derby : कराचीत रंगली गाढवांची शर्यत

कराची : पाकिस्तानातील कराची शहरात नुकतीच गाढवगाड्यांची अनोखी शर्यत पार पडली. नेटिव्ह जेटी ब्रिजपासून कमिशनर

FDA : राज्यातील १३ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई : अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने

Jamkhed : नान्नज प्राथमिक आरोग्य केंद्र बॉम्बने उडविण्याची धमकी; डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना शिवीगाळ

जामखेड : नान्नज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांशी वाद घालत एका व्यक्तीने शिवीगाळ

Jalgaon : सुप्रीम कॉलनीतील गोमांस प्रकरणानंतर महापालिकेची धडक कारवाई, अनधिकृत गोडाऊन जमीनदोस्त

Jalgaon : जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात गोमांस आढळल्याच्या घटनेनंतर जळगाव शहर महानगरपालिकेने (Jalgaon City Municipal Corporation)

Shravan Putrada Ekadashi 2026 : श्रावण पुत्रदा एकादशी 23 ऑगस्टला; जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि धार्मिक महत्त्व

Shravan Putrada Ekadashi : श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला ‘श्रावण पुत्रदा एकादशी’ किंवा ‘पवित्रा एकादशी’ असे

Mumbai News : मुंबईत पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

मुंबई : पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीत घडली. गौतम