'देऊळ' पुन्हा उघडतंय...

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सतत काही ना काही घडत असते आणि त्यायोगे हे क्षेत्र कायम 'समथिंग हॅपनिंग' या पद्धतीत मोडते. मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एक नवीन ट्रेंड रुळला आहे आणि तो म्हणजे चित्रपटांचे 'सिक्वेल्स'; अर्थात गाजलेल्या चित्रपटाचा दुसरा भाग. एखादा मराठी चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला की त्याचा सिक्वेल काढायचा, अशी सध्या मराठी चित्रपटसृष्टीत पद्धत सुरू झाली आहे. चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाल्यानंतर, साहजिकच त्याची तुलना त्या चित्रपटाच्या पहिल्या भागाशी केली जाते आणि मग कोणता भाग अधिक चांगला, अशा चर्चांनाही उधाण येते.


आतापर्यंत आलेल्या काही चित्रपटांचे सिक्वेल्सही गाजलेले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत सन २०१५ मध्ये एक चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि तो म्हणजे 'देऊळ बंद'. हा चित्रपट प्रदर्शित होताच मराठी सिनेशौकिनांनी तो डोक्यावर घेतला. अध्यात्म आणि विज्ञान यांच्या माध्यमातून फुलणारी कथा, हा या चित्रपटाचा गाभा होता. त्या पद्धतीने ही गोष्ट पडद्यावर मांडण्यात आली होती आणि रसिकांना ती 'अपील' झाली. आजही या चित्रपटाची मोहिनी रसिकांवर कायम आहे. आता ११ वर्षांनंतरही जेव्हा घरातल्या छोट्या पडद्यावर हा चित्रपट लागतो; तेव्हा त्याचा मनसोक्त आनंद रसिक घेताना दिसतात. आता याच 'देऊळ बंद'चा दुसरा भाग; अर्थात सिक्वेल मे महिन्यात प्रदर्शित होऊ घातला आहे.


'देऊळ बंद २' सादर करताना 'आता परीक्षा देवाची' असे या चित्रपटाचे सांगणे आहे आणि या 'सब हेडिंग'ने रसिकांची उत्सुकता वाढवली आहे. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालत श्री स्वामी समर्थ महाराज आणि वैज्ञानिक मंडळी यांच्याभोवती फेर धरणाऱ्या मूळ 'देऊळ बंद' चित्रपटाने रसिकांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते आणि तेव्हाच या चित्रपटाचा दुसरा भाग यावा, अशी इच्छा अनेकांची होती. याला प्रमाण मानत लेखक व दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी या चित्रपटाचा सिक्वेल काढण्याचे नक्की केले आणि आता तो प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे शीर्षक 'देऊळ बंद २' असे असले, तरी आता हे 'देऊळ' लवकर उघडले जाणार आहे.

Comments
Add Comment

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.

Vijay & Trisha : घटस्फोटाच्या चर्चांनंतर विजय-त्रिशाचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा

Dwidha Movie : 'द्विधा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

मुंबई : मानवी नात्यांतील भावनिक गुंतागुंत, प्रेम, कर्तव्य आणि त्याग यांचा संवेदनशील वेध घेणाऱ्या ‘द्विधा’ या

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Instagramचा १० वर्षांनंतर वर्डमार्क बदलला; ‘Instagzam’ म्हणत युजर्सची खिल्ली, तुम्हाला नवीन डिझाइन कसं वाटलं?

मुंबई : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपल्या ब्रँडच्या लिखित ओळखीत

सिगारेटच्या पाकिटावर लिहिलं देशभक्तीचं अमर गीत! लतादीदींनी सुरुवातीला दिला होता नकार; ‘ऐ मेरे वतन के लोगों’ची कहाणी थक्क करणारी

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीच्या गाण्यांनी संपूर्ण देशाचं वातावरण भारून जातं. मात्र, ‘ऐ मेरे वतन के