RR VS DC IPL : दिल्ली पुन्हा लय पकडणार ? मिचेल स्टार्कच्या पुनारागमनाकडे सर्वांचे लक्ष्य...

Ipl 2026 RR vs DC : दिल्लीने आयपीएल 2026 ची सुरूवात आशादायक पद्धतीने केली होती. मात्र लीगच्या मधल्या टप्प्यात दिल्लीची लय हरवली. काही दिवसांपूर्वीच घरच्या मैदानावर 264 धावा करुनही पराभाव पत्कराव लागला आणि 2 दिवसाच्या आत संघ अवघ्या 75 धावांवर गारद झाला. स्पर्धा निर्णायक टप्प्यावर असताना दिल्ली अजून लय शोधत आहे. या पार्श्वभूमीवर, मिचेल स्टार्कचे पुनरागमन दिल्लीसाठी संजीवनी ठरू शकते. मिचेलला 1 मे पासून खेळण्याची परवानगी मिळाली आहे. त्याचा अनुभव दिल्लीच्या गोलंदाजीला मजबूत करेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दिल्लीचा पुढचा सामना आज म्हणजेच शुक्रवार १ मे रोजी राजस्थानच्या विरोधात आहे. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जाणार आहे. राजस्थान हा एकमेव संघ आहे ज्याने पंजाबचा पराभव केला आहे. यामुळेच दिल्लीसाठी हा सामना महत्त्वाचा आहे.


या सामन्यात रोमांचक लढत पाहायला मिळेल. राजस्थानचा 15 वर्षीय खेळाडू वैभव सूर्यवंशी यंदाच्या हंगामात चर्चेचा केंद्रबिंदु आहे. वैभवने या हंगामात जसप्रित बुमराह, जोश हेझलवुड आणि भुवनेशवर कुमार सारख्या अनुभवी गोलंदाजांसमोर स्फोटक फटकेबाजी केली आहे. आता तो स्टार्क समोर कसा खेळतो ? याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष असेल.


राजस्थानसाठी दिलासादायक बाब म्हणजे त्यांची फलंदाजी फक्त टॉप ऑर्डरपुरती मर्यादित राहिलेली नाही. मागील सामन्यात डी. फरेरा आणि शुभम दुबेने अखेरच्या षटकात सामना जिंकवून दिला होता. यामुळे राजस्थान कागदावर दिल्लीपेक्षा मजबूत दिसत आहे. दिल्लीच्या अडचणी मात्र कायम आहेत. स्पर्धा मधल्या टप्प्यात आली असूनही दिल्लीची सलामीची जोडी अद्याप ठरलेली नाही. सतत प्रयोग सुरू आहेत. आता स्टार्कच्या आगमनामुळे दिल्लीची ताकद वाढेल, अशी आशा व्यक्त होत आहे.


दिल्ली कॅपिटल्स : साहिल परख, केएल राहुल (यष्टीरक्षक), नितीश राणा, समीर रिझवी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, अक्षर पटेल (कर्णधार), दुष्मंथा चमीरा, काइल जेमिसन, कुलदीप यादव, टी. नटराजन, औकीब नबी दार, आशुतोष शर्मा, विप्रराज विजय निगम, लुगुन त्रिभुवन, मुगुसेनपुर, लूकपुर, औकिब नबी दार. कुमार, अजय जाधव मंडल, पृथ्वी शॉ, पथुम निसांका, रेहान अहमद, माधव तिवारी, मिचेल स्टार्क, करुण नायर.


राजस्थान रॉयल्स : वैभव सूर्यवंशी, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग (कर्णधार), डी. फरेरा, रवींद्र जडेजा, दासून शनाका, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, बृजेश शर्मा, यश राज पुंजा, रवि सिंह, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे, शुभम दुबे, शिमरॉन हेटमायर, अ‍ॅडम मिल्ने, अमन राव पेराला, विघ्नेश पुथुर, ल्हुआन-ड्रे प्रिटोरियस, क्वेना मफाका, युधवीर सिंग चरक, सुशांत मिश्रा, कुलदीप सेन, संदीप शर्मा.

Comments
Add Comment

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील

अजिंक्य रहाणेची नवी इनिंग सुरू होणार

मुंबई : भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे आता खेळाडू म्हणून नव्हे, तर समालोचकाच्या नव्या भूमिकेत

Cristiano Ronaldo Marriage : अखेर रोनाल्डोने जॉर्जिनासोबत थाटला संसार! 10 वर्षांच्या प्रेमकहाणीला लग्नाची सुंदर किनार

फुटबॉलविश्वातील दिग्गज स्टार क्रिस्टियानो रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. रोनाल्डोने

IND vs AFG: भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर; दिल्लीत रंगणार सामना

भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात लवकरच एका रोमांचक टी-20 मालिकेचे आयोजन केले जाणार आहे. या मालिकेची चाहते

Abishek Porel : क्रिकेटपटू अभिषेक पोरेल हुगळीत अटक; कथित बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू आणि बंगालचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेल याला हुगळी येथे एका कथित बलात्कार प्रकरणात

Sourav Ganguly : क्रिकेटच्या ‘दादा’च्या कुटुंबावर संकट? गांगुली दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत तक्रार दाखल

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ‘दादा’ म्हणून प्रसिद्ध असलेला सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि त्याची