High Court Recruitment Exam : उच्च न्यायालय भरती परीक्षेत 'AI' च्या मदतीने कॉपी; धुळ्यातील धक्कादायक प्रकार

धुळे : आजवर परीक्षेत कॉपी करण्याच्या अनेक जुन्या पद्धती समोर आल्या आहेत, मात्र आता कॉपीबहाद्दरांनी यासाठी चक्क अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा म्हणजेच 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'चा (AI) आधार घेतल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार धुळे शहरात उघडकीस आला आहे. उच्च न्यायालयातील लिपिक आणि शिपाई पदांच्या भरती परीक्षेदरम्यान मोबाईल फोन आणि 'एआय' तंत्रज्ञानाच्या मदतीने कॉपी करणाऱ्या एका उमेदवाराला भरारी पथकाने रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी संबंधित उमेदवाराविरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



असा घडला प्रकार


धुळे शहरातील जिजामाता कन्या हायस्कूल येथील परीक्षा केंद्रावर उच्च न्यायालयाच्या लिपिक आणि शिपाई पदांसाठी लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेला बसलेला नाजीब अली तबसुम सय्यद (रा. धुळे) या उमेदवाराने अतिशय चतुराईने परीक्षा केंद्रात मोबाईल फोन लपवून नेला होता. परीक्षा सुरू असताना त्याने गुपचूप प्रश्नपत्रिकेचा फोटो काढला आणि तो इंटरनेटवर 'गुगल' व 'एआय' आधारित टूल्सवर (AI Tools) अपलोड करून प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न चालवला होता.



भरारी पथकाची सतर्कता


परीक्षा सुरू असताना केंद्रावर पाहणी करण्यासाठी आलेल्या भरारी पथकाला एका वर्गात संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता याची माहिती तत्काळ परीक्षा पर्यवेक्षकांना दिली. त्यानंतर संशयित उमेदवाराची कसून तपासणी करण्यात आली असता, त्याच्याकडे मोबाईल फोन आढळून आला. मोबाईलची तपासणी केली असता, त्याने प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून 'एआय'च्या माध्यमातून कॉपी केल्याचे स्पष्ट झाले.



पोलिसांत गुन्हा दाखल


या प्रकारानंतर परीक्षा केंद्रावर एकच खळबळ उडाली. या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना पोलीस उपविभागीय अधिकारी राजकुमार उपासे यांनी सांगितले की, कॉपी करताना रंगेहात पकडण्यात आलेला परीक्षार्थी नाजीब अली तबसूम सय्यद याच्या विरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात फसवणूक आणि इतर संबंधित कायद्यांच्या कलमांन्वये रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, या गैरप्रकारात आणखी कोणाचा सहभाग आहे का, यादिशेनेही चौकशी केली जात आहे.

Comments
Add Comment

Ashish Shelar : दहिहंडी उत्सवाला युनेस्कोमध्ये घेऊन जाणार, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे दहिहंडी उत्सवाला युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत नेण्यासाठी प्रयत्न करीत

Prakash Abitkar : गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

गारगोटी येथे रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर उभे करण्याचे नियोजन रुबी हॉल क्लिनिक

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा

Pune Weather : पुण्यात रविवारी पावसाच्या सरींची शक्यता; घाटमाथ्यावर यलो अलर्ट

पुणे : रविवार, 16 ऑगस्ट रोजी पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता