महाराष्ट्राच्या 'मिसिंग लिंक' या ड्रीम प्रोजेक्टची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणारा महत्त्वाकांक्षी असलेला मिसिंग लिंक प्रकल्प (Mumbai Pune Missing Link Raod) आजपासून सुरु झाला आहे. आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग क्षमतावाढ अंतर्गत 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे लोकार्पण व कोनशिला अनावरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याहस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.


राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावानं ओळखल्या जाणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या प्रवासात आज महत्वाचा टप्पा गाठला गेला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवमुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.


महाराष्ट्राचा ड्रीम प्रोजेक्ट


10.5 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात दोन भव्य बोगदे, उंच व्हायाडक्ट आणि टायगर व्हॅलीवरील सुमारे 182 मीटर उंच केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे. सुमारे 23.75 मीटर रुंद बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातो. 70 किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे, मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला आहे. लोणावळा तलावाच्या 182 मीटर खालून हा रस्ता जाणार आहे. (Mumbai Pune Missing Link)


मिसिंग लिंक प्रकल्पाची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद


मिसिंग लिंक हा प्रकल्प केवळ रस्ता नसून आधुनिक अभियांत्रिकीचा एक अद्भुत नमुना आहे. याचे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे यातील 23.5 मीटर रुंदीचा बोगदा, ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून करण्यात आली आहे. हा बोगदा लोणावळा तलावाच्या चक्क 180 मीटर खालून खोदण्यात आला आहे.


कसा आहे मिसिंग लिंक प्रकल्प ?


मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंक प्रकल्पामुळे 6 किलोमीटरने अंतर कमी होणार आहे. या मिसिंग प्रकल्पामध्ये खोपोली एक्झिटपासून लोणावळ्यापर्यंत दोन्ही दिशेने 4 मार्गिकांसाठीचे दोन बोगदे उभारण्यात आले आहे. यातील पहिला बोगदा 8.92 किमी, तर दुसरा बोगदा 1.75 किमीचा आहे. तर या बोगद्याला जोडणारा आणि टागर व्हॅलीवर बांधला जाणारा केबल-स्टेड पूल जमिनीपासून सुमारे 132 फूट उंचीवर आहे.


मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वेगमर्यादा
हलकी वाहने : ताशी 100 किलोमीटर
प्रवासी वाहने/बस : ताशी 80 किलोमीटर


पुढील वाहनांना मिसिंल लिंकवर 'नो एन्ट्री'


आता मिसिंग लिंकवर सर्वच वाहनांना परवानगी नसणार आहे. त्यात ज्वलनशील वाहने, स्फोटक किंवा धोकादायक वस्तू वाहतूक करणाऱ्या वाहनांना मिसिंग लिंक पूर्णपणे बंद असेल. या वाहनांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाचा वापर करावा.

Comments
Add Comment

Suman Kale Murder Case : पारधी समाजाच्या सुमन काळे हत्या प्रकरणात राज्य शासनाची नव्याने एसआयटी; विशेष तपास पथक गठित

अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील पारधी समाजातील सुमन काळे यांच्या सन २००७ मधील संशयास्पद पोलिस कोठडीतील मृत्यू

Ashish Shelar : दहिहंडी उत्सवाला युनेस्कोमध्ये घेऊन जाणार, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे दहिहंडी उत्सवाला युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत नेण्यासाठी प्रयत्न करीत

Prakash Abitkar : गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

गारगोटी येथे रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर उभे करण्याचे नियोजन रुबी हॉल क्लिनिक

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा