Crude Oil Prices : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ११५ डॉलरच्या पार

पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारात मोठी उलथापालथ होत असून कच्च्या तेलाच्या किमतीत (Crude Oil Prices) सातत्याने वाढ होत आहे. जागतिक स्तरावरील प्रमुख निर्देशांक असलेल्या ब्रेंट क्रूड तेलाने ११५ डॉलर प्रति बॅरलचा टप्पा ओलांडला, तर वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (डब्ल्यूटीआय) क्रूडनेही १०४ डॉलरचा स्तर पार केला आहे.


मंगळवारच्या तुलनेत ब्रेंट क्रूडने ११०.६२ डॉलरवर व्यवहार सुरू केला, मात्र दिवसभरात तेजी कायम राहिल्याने भारतीय वेळेनुसार सायंकाळी पाचच्या सुमारास तो ११५.६१ डॉलरपर्यंत झेपावला. त्यानंतर थोडीशी घसरण झाली असली तरी सायंकाळी सहापर्यंत तो ११५.४९ डॉलरवर, म्हणजेच ३.८० टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होता. दुसरीकडे डब्ल्यूटीआय क्रूडने सुरुवातीला ९९.२३ डॉलरवरून घसरण दाखवली, पण नंतरच्या सत्रात जोरदार वाढ होत १.४.३२ डॉलरपर्यंत पोहोचला आणि दिवसाअखेरीस १.४.०९ डॉलरवर (Crude Oil Prices) स्थिरावला.



फ्युचर्स बाजारातही तेजीचा कल कायम असून जून महिन्यासाठी ब्रेंट फ्युचर्स ११.२६ डॉलरवर बंद झाले, तर डब्ल्यूटीआय फ्युचर्स ९९.९३ डॉलरपर्यंत पोहोचले. सलग सात दिवस ब्रेंटमध्ये वाढ नोंदली गेली आहे. तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेतील विलंब आणि होर्मुज सामुद्रधुनीत वाढती नाकेबंदी यामुळे पुरवठा खंडित होण्याची भीती निर्माण झाली आहे. जगातील सुमारे २० टक्के तेल पुरवठा या मार्गे होत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. (Crude Oil Prices)


या पार्श्वभूमीवर भारतासारख्या आयात-आधारित देशांसाठी मोठे आर्थिक आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. वाढत्या किमतीमुळे चालू खात्यातील तूट वाढू शकते, वित्तीय तुटीवर दबाव येऊ शकतो आणि रुपयाची घसरण होऊ शकते. त्याचबरोबर महागाई वाढण्याची आणि परकीय गुंतवणुकीचा ओघ कमी होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. (Crude Oil Prices)



दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात किमती (Crude Oil Prices) वाढूनही देशातील पेट्रोल-डिझेल दर स्थिर ठेवण्यात आले आहेत, त्यामुळे सरकारी तेल कंपन्यांवर आर्थिक ताण वाढत असून त्यांचे नुकसानही वाढत असल्याचे चित्र आहे.

Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Supriya Sule and Vinod Tawde : सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे बैठक सोडून अचानक निघाले, एका कारमधून गेले; चर्चेला उधाण

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच एक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Bharat Gogawale : नाशिकला गिरीश महाजन आणि रायगडमध्ये भरत गोगावले करणार ध्वजारोहण

मुंबई : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय समारंभासाठी राज्य शासनाकडून जिल्हा निहाय ध्वजारोहण