BJP corporator Prakash Darekar : दहिसरच्या प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभारा

- दहिसरमध्ये कोकण भवन उभारा..


- भाजप नगरसेवक प्रकाश दरेकर यांची महापालिका अर्थसंकल्पात मागणी


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


शिवाजी महाराजांनी जनतेच्या कल्याणासाठी स्वराज्य उभे केले, तर डॉ. आंबेडकरांनी सर्वांना समान मतदानाचा अधिकार देऊन लोकशाही बळकट केली. या महामानवांच्या कार्याची आठवण चिरंतन कायम राहावी यासाठी दहिसर चेकनाक्याच्या प्रवेशद्वारावर त्यांचे भव्य पुतळे उभारावेत आणि परिसराचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी भाजपचे नगरसेवक प्रकाश दरेकर यांनी महापालिका सभागृहात आपल्या अर्थसंकल्पीय भाषणांत केली. तसेच मुंबईत दहिसरमध्ये कोकण भवन उभारले जावे, अशी मागणी केली.


सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पावर महापालिका सभागृहात बोलतांना भाजप नगरसेवक प्रकाश दरेकर यांनी यावेळी त्यांनी स्थानिक पातळीवरील अनेक विकासकामांचे मुद्देही मांडले. दहिसर चेकनाक्याजवळ उभारलेल्या सात मजली इमारतीत हॉटेल सुरू करून पर्यटनाला चालना द्यावी, तसेच प्रस्तावित ट्रान्सपोर्ट हबच्या ठिकाणी अत्याधुनिक ट्रॉमा केअर रुग्णालय उभारावे, अशी सूचना त्यांनी केली. यामुळे अपघातग्रस्त आणि बाहेरून येणाऱ्या रुग्णांना त्वरित उपचार मिळू शकतील, असे त्यांनी नमूद केले. तसेच पाणी समस्येवर बोलताना दरेकर यांनी कोयना धरणाचे पाणी मुंबईत आणण्यासाठी प्रकल्प अहवाल तातडीने तयार करण्याची मागणी केली. पश्चिम उपनगरांना लोकसंख्येनुसार पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याचे सांगत त्यांनी हा अन्याय दूर करण्याचेही आवाहन केले.



कोयनेचे पाणी मुंबईत आणा :


कोयना धरणाचे पाणी मुंबईत आणण्याचा प्रयत्न व्हायला हवा,असे सांगत कोयनाचे पाणी मुंबईत आणण्यासाठीचा प्रकल्प अहवाल त्वरीत तयार करण्यात यावा. कोयनेचे पाणी मुंबईत आणण्यासाठी काय प्रयत्न केला जावा,अशी सूचना केली.



केतकीपाडा खदान येथे धरण उभारा..


सहा मल जल प्रक्रिया केंद्रातून तृत्तीयस्तर पाण्यावर प्रक्रिया करून त्यावर शुध्दीकरण करून त्याचा वापर पिण्यासाठी तसेच इतर पाणी पिण्याव्यतिरिक्त वापर करणार आहोत. मुंबईतील पाणी समस्या ही मोठी असून पश्चिम उपनगराची लोकसंख्या शहर आणि पूर्व उपनगरापेक्षा अधिक आहे, परंतु पाणी वितरणांमध्ये लोकसंख्या निहाय पाणी वाटप होत नाही. लोकसंख्या अधिक असूनही पश्चिम उपनगराला मुबलक पाणी पुरवठा होत नाही, याबाबत आपल्या पक्षाचे आमदार योगेशजी सागर यांचा प्रयत्न सुरु आहे. याबाबत राज्य शासनानेही समितीही गठित केली आहे. तरीही पश्चिम उपनगराला लोकसंख्येनुसार पाणी वाढवून मिळत नाही. त्यामुळे पश्चिम उपनगरातील आणि आम्ही शेवटच्या टोकाला असलेल्या दहिसरमधील नागरिकांवर अन्याय असल्याचेही त्यांनी मत मांडले.



बोरीवली दहिसर मध्ये व्हावे कोकण भवन :


महापालिका सभागृहात जवळपास ८० टक्के नगरसेवक कोकणातील आहेत. त्यामुळे मुंबईत कोकण भवन उभारले जावे ही प्रत्येक कोकणी माणसांची इच्छा आहे.आपल्या कोकणातील शेतकरी, उत्पादक, उद्योजक यांना थेट बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आंबा, काजू, मसाले आदींसह हातमाग उत्पादनांना त्याठिकाणी जागा उपलब्ध करून दिली जावी. यामाध्यमातून एकप्रकारे कोकणातील मेवा आणि उत्पादन यांना एकप्रकारे बाजारपेठ मिळेल तसेच या माध्यमातून मुंबईसारख्या ठिकाणी स्थिर व्यासपीठही मिळेल. त्यामुळे मुंबईत प्रायोगिक तत्वावर दहिसरमध्ये अशाप्रकारे कोकण भवन उभारले जावे. ज्यामुळे कोकण आणि मुंबई यांचा भावनिक व आर्थिक दुवा अधिक मजबूत करता येईल.



कौशल्य विकास केंद्र :


आजचा तरुण केवळ नोकरी शोधणारा नसून तो नोकरी निर्माण करणारा व्हावा, ही काळाची गरज आहे. दहिसर परिसरात कौशल्य विकास केंद्र उभारून तरुणांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण द्यावे. आयटी, डिजिटल मार्केटिंग, इलेक्ट्रिकल-मेकेनिकल ट्रेड्स, स्टार्टअप मार्गदर्शन अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण देऊन आपण रोजगारक्षम पिढी तयार करण्याचा प्रयत्न केला जाईल. आपले खासदार पियुषजी गोयल आणि आपले कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढाजी यांच्या प्रयत्नाने कशाप्रकारची कौशल्य विकास केंद्र कांदिवलीमध्ये उभारली जात आहेत, तशीच आता बोरीवली आणि दहिसरमध्येही उभारली जावीत.



महिला औद्योगिक भवन :


महिलांना आर्थिक दृष्ट्या सबळ करणे हे केवळ घोषणांमधून न होता प्रत्यक्ष कृतीतून व्हायला हवे. महिला औद्योगिक केंद्र उभारुन त्याद्वारे आर्थिक सबळ करण्याचा प्रयत्न केला जावू शकतो. महिलांना उत्पादन प्रक्रिया, उद्योग, घरगुती व्यवसाय, स्वयं-साहाय्य गटांसाठी जागा व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे हे आवश्यक आहे. यामुळे महिला आत्मनिर्भर होतील आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होईल, त्यामुळे अशाप्रकारे महिला औद्योगिक भवन आमच्या दहिसरमध्ये उभारण्याचा प्रशासनाने विचार करावा,अशी सूचना केली.

Comments

Chayya Balu Shinde    May 7, 2026 12:12 AM

Agdi barobar 👍👌 mhamanvanche vichar rujalech pahije 🙏🙏🙏🙏🙏

Add Comment

Lalbaug, Parel : लालबाग, परळ मधील शाळा व मनोरंजन मैदानासाठी आरक्षित भूखंडाने १२ वर्षांनी घेतला मोकळा श्वास

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या एफ (दक्षिण) विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या धडक कारवाईत

Babasaheb Patil : गटसचिवांच्या न्याय्य मागण्यांवर कायदेशीर व प्रशासकीय बाबी तपासून सकारात्मक निर्णय घेऊ

मुंबई, दि. ९ जून : राज्यातील गटसचिवांच्या सेवा विषयक प्रश्न वेतन थकीत देयके तसेच जिल्हा संवर्गाच्या

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मानाचा स्कॉच पुरस्कार

शासन आपल्या दारी'च्या यशाबद्दल 'स्कॉच ग्रुप' कडून झाला सन्मान २०२४ साली जाहीर झालेला पुरस्कार आज उपमुख्यमंत्री

MSRDC : आराखडा तयार करावा,ऊर्जा राज्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई,  : तिसऱ्या मुंबईचा विकास जलद गतीने होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विकास प्रक्रियेवर लक्ष

Dr. Neelam Gorhe : महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि विद्यार्थी सुसंवादासाठी व्यासपीठ सुरू होणार

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा पद्धतीत तातडीने सुधारणा करावी आणि स्पर्धा परीक्षार्थींच्या

DADAR BEST ACCIDENT : एकाचा मृत्यू, ६ जखमी; बेस्टकडून उच्चस्तरीय चौकशी समिती गठित

MUMBAI: सोमवारी सकाळी दादर पश्चिममधील कोतवाल गार्डन (प्लाझा) जवळ बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने पाच वाहनांना जोरदार धडक