Bacchu Kadu, Nilam Gorhe : अखेर विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवार झाले जाहीर; शिवसेनेच्या या नेत्यांना मिळणार उमेदवारी

मुंबई : महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. अशातच या निवडणुकीसाठी बच्चू कडू यांचा पक्ष शिवसेनेत पक्षप्रवेश झाला असून शिवसेनेचे विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवार ठरले असल्याची माहिती समोर आली आहे. काही वेळातच उमेदवार अर्ज भरले देखील जाण्याची माहिती समोर आली आहे.


बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांना शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज मिळणार आहे. तर गेल्या २४ तासात झालेली चर्चा आणि समोर ठेवलेल्या मागण्या पूर्ण करण्याचे मान्य केल्यानंतर आज बच्चू कडू यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. शिवसेनेकडून पक्षप्रवेश होताच उमेदवारांची नावे जाहीर झाली. शिवसेनेकडून आधी पासून नीलम गोऱ्हे याच्या नावाची चर्चा रंगली होती.
बच्चू कडू यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर बच्चू कडू यांच्या नावावर देखील शिक्कामोर्तब झाले.



महायुती आणि महाविकास आघाडी यांनी जाहीर केली उमेदवार यादी जाहीर.


भाजप


१. सुनील कर्जतकर
२. माधवी नाईक
३. संजय भेंडे
४. विवेक कोल्हे
५. प्रमोद जठार
६. प्रज्ञा सातव


राष्ट्रवादी काँग्रेस


७. झिशान सिद्दीकी


शिवसेना


१. नीलम गोऱ्हे
२. बच्चू कडू


महाविकास आघाडी


१०. अंबादास दानवे उबाठा



तर काँग्रेस माघार घेणार


विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला जागा सोडावी अशी अट असण्याची शक्यता असल्याने, या अटीनुसार काँग्रेस माघार घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय उबाठाने अट मान्य केल्यास काँग्रेस या निवडणुकीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.



विधान परिषदेचा संपूर्ण निवडणुकीचा कार्यक्रम


निवडणुकीची अधिसूचना जारी करणे: २३ एप्रिल २०२६


उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस : ३०० एप्रिल २०२६


उमेदवारी अर्जाची छाननी: २ मे २०२६


उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : ४ मे २०२६


मतदानाची तारीख : १२ मे २०२६


मतदानाची वेळ : सकाळी ९ वाजल्यापासून ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत


मतमोजणी : १२ मे २०२६ संध्याकाळी ५ वाजता


निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख : १३ मे २०२६

Comments
Add Comment

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि