मुंबई : महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. अशातच या निवडणुकीसाठी बच्चू कडू यांचा पक्ष शिवसेनेत विलीन झाला असून शिवसेनेचे विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवार ठरले असल्याची माहिती समोर आली आहे. काही वेळातच उमेदवार अर्ज भरले देखील जाण्याची माहिती समोर आली आहे.
बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांना शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज मिळणार आहे. तर गेल्या २४ तासात झालेली चर्चा आणि समोर ठेवलेल्या मागण्या पूर्ण करण्याचे मान्य केल्यानंतर आज बच्चू कडू यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. शिवसेनेकडून पक्ष प्रवेश होताच उमेदवारांची नावे जाहीर झाली. शिवसेनेकडून आधी पासून नीलम गोऱ्हे याच्या नावाची चर्चा रंगली होती. बच्चू कडू यांचा पक्ष विलीन झाल्यानंतर बच्चू कडू यांच्या नावावर देखील शिक्कामोर्तब झाले.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडण्याच्या मार्गावर आहे. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार जनशक्ती पक्ष हा पक्ष ...
महायुती आणि महाविकास आघाडी यांनी जाहीर केली उमेदवार यादी जाहीर.
भाजप
१. सुनील कर्जतकर २. माधवी नाईक ३. संजय भेंडे ४. विवेक कोल्हे ५. प्रमोद जठार ६. प्रज्ञा सातव
राष्ट्रवादी काँग्रेस
७. झिशान सिद्दीकी
शिवसेना
१. नीलम गोऱ्हे २. बच्चू कडू
महाविकास आघाडी
१०. अंबादास दानवे उबाठा
तर काँग्रेस माघार घेणार
विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला जागा सोडावी अशी अट असण्याची शक्यता असल्याने, या अटीनुसार काँग्रेस माघार घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय उबाठाने अट मान्य केल्यास काँग्रेस या निवडणुकीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाची चर्चा रंगली होती. अखेर आज म्हणजेच गुरुवार ३० एप्रिल रोजी बच्चू कडू यांनी ...
विधान परिषदेचा संपूर्ण निवडणुकीचा कार्यक्रम
निवडणुकीची अधिसूचना जारी करणे: २३ एप्रिल २०२६
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस : ३०० एप्रिल २०२६
उमेदवारी अर्जाची छाननी: २ मे २०२६
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : ४ मे २०२६
मतदानाची तारीख : १२ मे २०२६
मतदानाची वेळ : सकाळी ९ वाजल्यापासून ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत
मतमोजणी : १२ मे २०२६ संध्याकाळी ५ वाजता
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख : १३ मे २०२६





