Special Session : नारी शक्तीसाठी महायुती सरकार मे महिन्यात घेणार विशेष अधिवेशन?

मुंबई : राज्यातील ‘लाडक्या बहिणीं’साठी विविध योजनांचा धडाका लावल्यानंतर आता महायुती सरकार महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर देशपातळीवर निर्णायक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. महिला आरक्षणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मे महिन्यात राज्य विधिमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्याचे संकेत विश्वसनीय सूत्रांनी दिले आहेत. या अधिवेशनाच्या माध्यमातून महिला आरक्षणाचा मार्ग प्रशस्त करण्यासोबतच विरोधकांची कोंडी करण्याची रणनीती सत्ताधारी पक्षाने आखल्याचे समजते.


महिला आरक्षण विधेयक अर्थात ‘नारी शक्ती वंदन विधेयक’ संसदेत नामंजूर झाल्यानंतर, या मुद्द्यावर विरोधकांचा दुटप्पी चेहरा जनतेसमोर उघडा करण्यासाठी भाजपने देशव्यापी मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रात हे विशेष अधिवेशन घेण्याचे नियोजन सुरू आहे. या एक दिवसीय कामकाजात सर्वपक्षीय आमदारांना आपली भूमिका मांडण्याची संधी मिळणार असून, आरक्षणाला पाठिंबा देणारा ठराव याद्वारे संमत केला जाण्याची शक्यता आहे.


मे महिन्यात हे अधिवेशन पार पडणार असले तरी, त्याची निश्चित तारीख अद्याप प्रशासकीय स्तरावर ठरलेली नाही. मात्र, लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब होऊन तारीख जाहीर केली जाईल. या अधिवेशनामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे असून, महाविकास आघाडी या विशेष अधिवेशनाला कशा प्रकारे सामोरी जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Comments
Add Comment

Tarun Tejpal : शरण या, तुरुंगात जा आणि शिक्षा भोगायला सुरुवात करा; नंतर...

नवी दिल्ली :  'तहलका'चे माजी संपादक तरुण तेजपाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बलात्कार प्रकरणी

Nashik Simhastha Kumbhmela : ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’, २८ ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; प्रवेश विनामूल्य

Nashik Simhastha Kumbhmela : नाशिककर, भाविक, विद्यार्थी आणि सांस्कृतिक रसिकांसाठी ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’ची भक्ती आणि

Nashik Crime News : 'माझा नाद सोडून दे, माझे...', प्रेम नाकारल्याने मुलीनं उचललं टोकाचं पाऊल

Nashik Crime News : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पूर्वाश्रमीचा प्रियकर आणि त्याच्या नवीन प्रेयसीच्या छळाला

Cab vs Auto : बोरीवली स्टेशनबाहेर कॅबचालकाला धमकी? व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं?

Mumbai : एका व्हायरल व्हिडिओमध्ये, मुंबईतील बोरीवली स्टेशन ईस्टच्या प्रवेशद्वारावर एक ऑटोचालक एका कॅबचालकाला

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळात वर्णी लागणार?

मुंबई : भाजपच्या पक्षसंघटनेची सर्वोच्च आणि सर्वशक्तिशाली समिती असणाऱ्या संसदीय मंडळात लवकरच काही बदल केले

Ahilyanagar Crime : संतापजनक ! धावत्या एसटीत गुंडाची महिलेवर लघुशंका, पुढे...

Ahilyanagar Crime : अहिल्यानगरमधून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. रविवारी पहाटे एका तळीराम गुंडाने माणुसकीची हद्द पार