Nashik : नाशिकमधील वृक्षतोडीला ‘हरित लवादा’ची तूर्तास स्थगिती, पुढील सुनावणी 'या' तारखेला होणार

नाशिक : नाशिककरांना तूर्तास दिलासा मिळाला आहे कारण शहरातील सर्वच भागातील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाने दि.१९ जून २०२६ पर्यंत स्थगिती कायम ठेवली आहे. राष्ट्रीय हरित लवादाने दि.२८ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली होती. तसेच याबाबत नाशिक महापालिका प्रशासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. याप्रकरणी आज (दि.२८) रोजी सुनावणी झाली, यावेळी राष्ट्रीय हरित लवादाने (National Green Tribunal) १९ जूनपर्यंत वृक्षतोडीबाबत स्थगिती कायम ठेवत असल्याचे अधोरेखित केले आहे. (Nashik)


त्यासोबतच राष्ट्रीय हरित लवादाने (National Green Tribunal) हे देखील स्पष्ट केले आहे की, अत्यंत निकडीच्या प्रसंगी झाड तोडणे आवश्यक असल्यास त्यासाठी देखील आता थेट हरित लवादाची परवानगी घ्यावी लागणार आहे, असे निर्देश लवादाने दिले आहेत. यामुळे वृक्षतोडीबाबत मनपाच्या मनमानी कारभाराला काही प्रमाणावर आता चाप बसणार आहे.


‘मनीष बाविस्कर विरुद्ध नाशिक महानगरपालिका’


‘मनीष बाविस्कर विरुद्ध नाशिक महानगरपालिका’ या गाजलेल्या खटल्यात स्थगिती आदेश मागे घेण्यासाठी महापालिकेने (Nashik Municipal Corporation) दिल्लीहून वकिलांची मोठी फौज बोलावली होती. महापालिकेच्या बाजूने ‘अपघातग्रस्त’ म्हणून काही अर्जदार आणि ‘फ्रॉव्हसी अकॅडमी’चे रतन लथ यांनी मध्यस्थी अर्ज दाखल केले होते. मात्र, अर्जदार मनीष बाविस्कर यांचे वकील ॲड. श्रीराम पिंगळे यांनी या अर्जांना कडाडून विरोध केला. हे अर्जदार महानगरपालिकेने ‘प्लांट’ केलेले असून ते दिशाभूल करत असल्याचे पिंगळे यांनी लवादाच्या निदर्शनास आणून दिले. लवादाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत दोन्ही अर्ज फेटाळून लावले.


दरम्यान, महानगरपालिकेकडून झाडे कोसळण्यामुळे जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत झाड तोडण्याची किंवा छाटण्याची परवानगी देण्यासाठी स्थगिती आदेशात सुधारणा करण्याची विनंती करण्यात आली. मात्र, लवादाने केवळ एवढीच सवलत दिली की अशा आपत्कालीन प्रकरणांमध्ये लवादाकडे स्वतंत्र अर्ज करता येईल. त्यामुळे आता स्थगिती आदेशात कोणताही मोठा बदल करण्यास लवादाने नकार दिला आहे.


पुढील सुनावणी 19 जून रोजी


दरम्यान, अर्जदार मनीष बाविस्कर यांनी ७ एप्रिलनंतर झालेल्या वृक्षतोडीविरोधात दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी करताना, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, उद्यान अधिकारी विवेक भदाणे आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना दोन आठवड्यांत आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तर या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 19 जून रोजी होणार आहे.


Comments
Add Comment

Forever Young Look : नेहमी चिरतरुण दिसायचंय? मग घरच्याघरी करा हे सोपे उपाय; त्वचा राहील तजेलदार आणि निरोगी

मुंबई : वाढते वय थांबवता येत नसले, तरी योग्य जीवनशैली आणि त्वचेची नियमित काळजी घेतल्यास दीर्घकाळ चिरतरुण आणि

Neeraj Chopra : नीरज चोप्रा या महिन्यात लॉझेन डायमंड लीगमध्ये उतरणार

लॉझेन : भारताचा स्टार भालाफेकपटू, माजी ऑलिम्पिक आणि जागतिक चॅम्पियन नीरज चोप्रा २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या लॉझेन

Asian Games : स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे तेजस शिर्से आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर

चेन्नई : महाराष्ट्राचा अडथळा शर्यतपटू (हर्डलर) आणि राष्ट्रीय विक्रमवीर तेजस शिर्से याला 'स्ट्रेस फ्रॅक्चर'च्या

Ahilyanagar Crime : साड्या पाहण्याचा बहाणा केला अन् 14 तोळ्याचे दागिने पळवले

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. साड्या पाहण्याचा बहाणा करत चक्क मैत्रिणीच्याच घरातून 14

Jalgaon : जळगावात अनधिकृत होर्डिंग्जवर मनपाचा बडगा, नागरिक समित्यांची स्थापना; २४ तासांत कारवाई बंधनकारक

Jalgaon : जळगाव शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स, फ्लेक्स आणि पोस्टर्समुळे शहराचे सौंदर्य बिघडत असून वाहतुकीलाही

Jalgaon : 'मिशन ग्रीन जळगाव सिटी’ अंतर्गत 1 लाख वृक्षारोपण, १० ऑगस्टपासून मोहिमेला सुरुवात

Jalgaon : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हरित महाराष्ट्र मिशन (Green Maharashtra Mission) अंतर्गत जळगाव शहर महानगरपालिका