Marathi Bhavan : इतर भाषिकांचे मुंबईत भवन, मराठी भवन का नाही?

- हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबईत सर्व राज्यातील भाषिकांचे भवन उभारण्यात आले आहेत. उत्तर भारतीय भवन, गुजराती भवन, मारवाडी भवन, राजस्थानी भवन असे भवन उभारण्यात येत असून मुंबईतही मराठी भवन उभारले जावे. यामध्ये राज्यातून येणाऱ्या आणि इतर राज्यातून येणाऱ्या मराठी भाषिकांची तिथे व्यवस्था करण्यात यावी. आणि या वास्तूला हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रस शरद पवार गटाचे नगरसेवक अजित रावराणे यांनी केली.



मुंबई महापालिकेच्या सन २०२६- २७च्या अर्थसंकल्पावर बोलतांना अजित रावराणे यांनी कोविड काळात ज्या ज्या रुग्णालयांमध्ये सेवा दिली गेली, त्या रुग्णालयांची आता दोन दोन रुग्णालये उभी राहिली आहेत. एका बाजुला कोविड काळात या खासगी रुग्णालयांची बिले भरताना रुग्णांचे खिसे खाली झाले, त्यांचे जीवन उध्वस्त झाले. मात्र, यामध्ये काही रुग्णालयांनी आपले खिसे भरले असून या रुग्णालयांची आता दोन दोन रुग्णालये उभी राहिलेली आता पहायला मिळत आहेत,असे सांगत त्यामुळे याची चौकशी व्हावी,तसेच खासगी रुग्णालयांवर महापालिकेसाठी काही खाटा राखीव असतात. त्यावरही महापालिकेचे नियंत्रण असायला हवे अशीही सूचना रावराणे यांनी केली.



मुंबईत अनेक खासगी महाविद्यालये असून त्यामध्ये गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय यांच्यासाठी काही कोटा राखीव असतो. परंतु मराठी विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयांमध्ये कोटा नसतो. त्यामुळे अशाप्रकारे कोटा राखीव ठेवण्याचा त्यांना कुणी अधिकार असा सवाल करत अशा कोटा पध्दतीमुळे मराठी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. त्यामुळे मुंबई ही आमची असून अशाप्रकारे कुणी जर दादागिरी करत असेल तर या मुंबईत खपवून घेवू नये असेही सांगितले.

Comments
Add Comment

Mumbai Lake : मुंबईला पाणीपुरवठा करणारा तानसा तलावही ओसंडून वाहू लागला

सचिन धानजी मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी (Lakes) तानसा तलाव बुधवारी २२ जुलै रोजी वाहू लागला.

BMC Building : महापालिका मुख्यालय इमारतीला वाळवी..

सचिन धानजी मुंबई : मुंबई महापालिकेच्या (BMC) कारभारावर टीका होत असताना तसेच भविष्यातील आर्थिक संकटाबाबत चिंता

BMC Action Mode : स्वच्छतेच्या मुद्द्यावर महापालिका ऍक्शन मोडवर

कामकाजात कुचराई करणाऱ्या अधिका-यांवर कारवाई करा, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांचे

BMC News : महापालिका कार्यालयांसह रुग्णालये, दवाखान्यांमध्ये आता पचापच बंद

मुंबई : मुंबईत (Mumbai) मोठ्याप्रमाणात तंबाखू (Tobacco), पान तसेच, मावा यांचे सेवन केले जात असून यामुळे बऱ्याचदा महापालिका

BMC : महापालिका सभेपाठोपाठ वैधानिक समित्यांचेही थेट प्रक्षेपण?

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सभागृहातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यात

BMC News : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धर्तीवर महापौर वैद्यकीय सहायता निधी कक्ष

मुंबई : मुंबईतील (Mumbai) गरीब, गरजू रुग्णांना महापौरांच्या माध्यमातून आर्थिक निधीची मदत केली जात असून मागील प्रशासक