Mumbai-Bhopal Flight Accident : मुंबई ते भोपाळ विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; १६६ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले

मुंबई : विमान अपघाताच्या अनेक घटना या समोर येत आहेत. अहमदाबादची एक भयंकर मोठी विमान दुर्घटनेच्या आठवणी आजही ताज्या आहेत. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून अशाच एक अपघाताची बातमी समोर आली आहे. मुंबई ते भोपाळकडे जाणारे एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला अन् १७५ प्रवाशांचे प्राण टांगणीला लागला.



नेमकं काय घडलं?


मुंबईतून भोपाळच्या दिशेने निघालेले एअर इंडिया A१६३ विमानाचे भोपाळमध्ये इमरजन्सी लँडिंग करण्यात आले. मुंबईकडून विमानाने उड्डाण घेताच काही वेळातच तांत्रिक बिघाड लक्षात आला. विमानात एकूण १७५ जण होते यात १६६ प्रवेशाचा समावेश होता.



मुंबईतून फ्लाईट AI६३३ ने उड्डाण केल्यानंतर तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने सूत्रे हलवून प्रोटोकॉल लागू करण्यात आला. प्रोटोकॉलनुसार ट्राफिक कंट्रोलशी संपर्क साधत लँडिंगची तयारी सुरु करण्यात आली.



मोठी दुर्घटना टळली


घटनेची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी त्वरित दाखल झाल्या. एटीसी, ग्राउंड स्टाफ, सीआयएसएफ आणि अग्निशमन दलाचे जवान घटनस्थळी पोहोचले होते, सर्वांनी आपली काम चोख बजावत, सर्व स्थिती सांभाळून घेतल्याने मोठा अपघात टळला आहे.



एअर इंडियाच्या जाहीर केलेल्या माहितीनुसार विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे संकेत मिळाल्यानंतर पायलटने SOP अंतर्गत निर्णय घेत. याच वेळेत पायलटने योग्य वेळेत अतिशय योग्य निर्णय घेतल्याने १७५ प्रवाशांचे प्राण वाचले. पायलट आणि ट्रॅफिक कंट्रोलसोबत योग्य समन्वय साधल्याने मोठी दुर्घटना टळली.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : तिबेटमध्ये अडकलेल्या ३७ महाराष्ट्रातील नागरिकांची मुख्यमंत्री फडणवीसांमुळे सुटका

- सागाहून काठमांडूकडे सुरक्षित प्रवास सुरू; ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील भाविकांचा

Keshav Srushti : केशवसृष्टीत सहल नेण्याचा काँग्रेस, सपाचा विरोध मोडून काढला

महापालिका सातवीच्या मुलांची सहल केशवसृष्टीत जाणारच, स्थायी समितीत प्रस्तावाला मंजुरी मुंबई (विशेष प्रतिनिधी)

Mumbai Mayor : मुंबईचा पुढील महापौर शिवसेनेचाच! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सध्या मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर असला तरी येणारा पुढील महापौर हा शिवसेनेचाच असेल

Kanjurmarg Station Footpath : कांजूरमार्ग रेल्वे स्थानक परिसरासह एलबीएसचा मार्गाच्या पदपथ होणार मोकळ्या

तब्बल या परिसरातील १००हून अधिक गाळ्यांवर होणार कारवाई मुंबई विशेष प्रतिनिधी : कांजूरमार्ग रेल्वेथ स्थानक

Cooper Hospital Mumbai : कुपर रुग्णालयात येत्या मार्च पर्यंत मिळणार एमआयसीयू सुविधा

स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : विलेपार्ले येथील कुपर रुग्णालयात सध्या १०

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत