पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटनांवर पुन्हा एकदा अज्ञात हल्लेखोरांनी निशाणा साधला आहे. शेख युसूफ आफ्रिदी (Sheikh Yousuf Afridi) या लष्कर-ए-तैबा Lashkar-e-Taiba (LeT) च्या कमांडरची खैबर पख्तुनख्वा या प्रांतात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी आफ्रिदीवर जवळून अनेक गोळ्या झाडल्या, त्यामुळे त्याला पळून जाण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. आफ्रिदी हा लष्कर-ए-तैबा प्रमुख हाफिज सईद याचा निकटवर्तीय मानला जात होता. तपास यंत्रणा या हत्येकडे ‘टार्गेटेड ऑपरेशन'म्हणून पाहत आहेत.
याआधी जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) प्रमुख मौलाना मसूद अझर (Maulana Masood Azhar) याचा मोठा भाऊ मुहम्मद ताहिर अन्वर (Muhammad Tahir Anwar) याचा पाकिस्तानमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता.
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वीच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राजधानी कोलकात्यात आपली हालचाल वाढवली आहे. केंद्रीय तपास ...
तसेच, मार्च २०२५ मध्ये अबू कताल उर्फ कतल सिंधी यालाही झेलम येथे अज्ञात हल्लेखोरांनी ठार केले होते. तो २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार मानल्या जाणाऱ्या हाफिज सईदचा जवळचा सहकारी होता.
या सलग हल्ल्यांमुळे पाकिस्तानमधील दहशतवादी नेटवर्कमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.






