Legislative Council Elections : विधान परिषदेसाठी सर्वच पक्षांकडून ‘वेट अँड वॉच’

अर्ज भरण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक; बच्चू कडूंच्या नावावरून शिवसेनेत अंतर्गत विरोध


मुंबई : राज्यातील विधान परिषदेच्या नऊ रिक्त जागांसाठी १२ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघे तीन दिवस उरले आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाने आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केलेली नाही. विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीच्या वाट्याला आठ, तर महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा येणार असल्याचे स्पष्ट असले, तरी अंतर्गत कुरबुरी आणि इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे दोन्ही बाजूंच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.



राज्यातील नऊ सदस्यांची मुदत १७ मे रोजी संपत आहे. संख्याबळानुसार भाजपला पाच, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दोन, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एक जागा मिळत आहे. महाविकास आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या एका जागेवर काँग्रेस आणि उबाठा यांपैकी कोण दावा करणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून प्रज्ञा सातव यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे.


दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दोन जागांसाठी तीव्र रस्सीखेच सुरू आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे नाव एका जागेसाठी निश्चित मानले जात असले, तरी दुसऱ्या जागेसाठी 'प्रहार'चे बच्चू कडू यांचे नाव चर्चेत आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करण्याच्या अटीवर कडू यांना संधी दिली जाऊ शकते. मात्र, शिवसेनेतील मंत्र्यांनी या दोन्ही नावांना तीव्र विरोध दर्शवल्याने पेच निर्माण झाला आहे. या शर्यतीत अभिजित अडसूळ, शीतल म्हात्रे आणि शायना एनसी यांचीही नावे चर्चेत आहेत.



भाजपची यादी दिल्लीत


दुसरीकडे, भाजपच्या गोटातून सुमारे ३० इच्छुकांच्या नावांची यादी दिल्लीत पाठवण्यात आली आहे. यापैकी पाच नावांवर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. पक्षातील निष्ठावंत आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची गणिते पाहूनच ही नावे जाहीर केली जातील, असे समजते.



जय पवार की अनिकेत तटकरे?


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) एका जागेसाठी अनेक दावेदार आहेत. अमोल मिटकरी, अनिकेत तटकरे, आनंद परांजपे आणि उमेश पाटील यांची नावे चर्चेत असतानाच, मिटकरी यांनी केलेल्या एका मागणीमुळे खळबळ उडाली आहे. "अजितदादांची उणीव भरून काढण्याची क्षमता असलेल्या जय पवार यांना विधान परिषदेवर पाठवावे. हा आश्वासक चेहरा पक्षासाठी संजीवनी ठरेल," असे ट्वीट अमोल मिटकरी यांनी केले आहे. त्यामुळे आता पक्ष कोणाला संधी देणार, जय पवार की अनिकेत तटकरे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)