Monday, April 27, 2026

IPL 2026 GT vs CSK : गुजरातकडून चेन्नईचा घरच्याच मैदानावर लाजिरवाणा पराभव!

IPL 2026 GT vs CSK : गुजरातकडून चेन्नईचा घरच्याच मैदानावर लाजिरवाणा पराभव!

आयपीएल २०२६ च्या ३७ व्या सामन्यात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. गुजरातने चेन्नईला त्यांच्या घरच्या मैदानावर, म्हणजेच चिदंबरम स्टेडियमवर धूळ चारली. गुजरातने हा सामना तब्बल ८ गडी राखून जिंकत स्पर्धेत दमदार पुनरागमन केलं आहे.

पहिला बॅटिंग करताना चेन्नईची सुरुवात चांगली झाली होती, पण अचानक सामना फिरला. रबाडा आणि सिराज यांनी अक्षरशः कहर केला. फक्त ७ चेंडूत संजू सॅमसन, उर्विल पटेल आणि सरफराज खान यांना त्यांनी पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांनी चेन्नईची बाजू सांभाळली. यामुळे चेन्नईने अखेर १५८ धावांपर्यंत मजल मारली.

या धावांचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात स्फोटक झाली. साई सुदर्शन शानदार ८७ धावांची खेळी खेळाला. त्याला साथ दिली कर्णधार गिल आणि बटलर यांनी गिलने ३३ धावा केल्या तर जॉस बटलरने नाबाद ३९ धावा केल्या. त्यामुळे केवळ १६.२ षटकांत २ विकेट्स गमावून गुजरातने हा सामना जिंकला.

या विजयामुळे गुजरात टायटन्सने गुणतालिकेत थेट ५ व्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे प्ले-ऑफचं गणित आता अधिकच कठीण झालं आहे.

Comments
Add Comment