मुंबई : बॅडमिंटनचे सामने आता २१x३ पद्धतीऐवजी १५x३ गुणपद्धतीनुसार खेळले जातील. सामने आता तीन २१x२१ गेम्सऐवजी तीन १५x१५ गेम्समध्ये खेळले जाणार आहेत. डेन्मार्कच्या हॉर्सेन्स येथे झालेल्या बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या नवीन गुणपद्धतीला प्रचंड बहुमताने मंजुरी देण्यात आली. सभेत सादर केलेला प्रस्ताव १९८-४३ मतांनी मंजूर झाला. ही नवीन पद्धत ४ जानेवारी २०२७ पासून लागू होणार आहे.
नवी दिल्ली : पंजाब किंग्सने शनिवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ६ गडी राखून विजय मिळवत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग (रन ...
"आम्ही पुढच्या पिढीसाठी एक खेळ तयार करत आहोत आणि आम्ही आमच्या खेळाडूंच्या दीर्घकालीन भविष्यात गुंतवणूक करत राहू. ३x१५ गुणपद्धतीचा उद्देश बॅडमिंटनला अधिक रोमांचक आणि स्पर्धात्मक बनवणे, वेळापत्रकात सुधारणा करणे, सामन्याच्या वेळेत अधिक एकसमानता आणणे आणि खेळाडूंचे आरोग्य व पुनर्वसनासाठी संभाव्य फायदे प्रदान करणे हा आहे," असे लीसावडट्रकुल यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
जागतिक संस्थेने सांगितले की, सदस्य आणि हितधारकांशी चाचणी, विश्लेषण आणि सल्लामसलत करण्याच्या प्रदीर्घ प्रक्रियेनंतर हा निर्णय घेण्यात आला. हे खेळाडूंच्या आरोग्याप्रती असलेल्या वचनबद्धतेतून आणि खेळाडूंना अधिक दीर्घ व यशस्वी कारकीर्द घडवण्यासाठी मदत करण्याच्या हेतूने प्रेरित, बीडब्ल्यूएफ सदस्यांचे सामूहिक मत दर्शवते.
हे प्रमुख बदल असतील:
खेळाच्या मध्यातला ६० सेकंदांचा ब्रेक आता ११ व्या पॉईंटऐवजी ८ व्या पॉईंटवर असेल.
दोन गेम्समधील ब्रेक १२० सेकंदांचा असेल.
१५ पॉईंट्सवर पोहोचल्यावर खेळाडूला दोन पॉईंट्सची आघाडी कायम ठेवावी लागेल.
जास्तीत जास्त पॉईंटची मर्यादा आता ३०-२९ ऐवजी २१-२० असेल.





