Ashok Kharat : भोंदू खरातचा आणखी एक कारनामा समोर, फार्म हाऊसवर मुलींसोबत दारु प्यायचा, नशेत... ; सीएचा अशोक खरातविरोधात धक्कादायक खुलासा

नाशिक : स्वतःला दैवी अवतार सांगणारा भोंदू अशोक खरात यांच्या गळाचा आता आणखी आवळला जाणार आहे कारण याप्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या एसआयटीला त्याच्याविरोधात धक्कादायक पुरावे मिळत आहे. या गंभीर प्रकरणात एसआयटीने अशोक खरात याच्या सीएची चौकशी केली होती. या सीएने अशोक खरातबाबत अनेक धक्कादायक गोष्टी उघड केल्या आहेत. (Ashok Kharat)


अशोक खरात याने या सीएचीही फसवणूक केली होती. त्याचा संशय आल्यामुळे या सीएने हेरगिरी करण्याचे ठरवले आणि अशोक खरात याच्या फार्महाऊसवर स्वयंपाक करणाऱ्या एका व्यक्तीला आपला हेर म्हणून पाठवले होते. या हेराने अशोक खरातबाबत बरीच धक्कादायक माहिती या सीएला दिली होती. ही सगळी माहिती सीएने एसआआयटीला दिली आहे. (Nashik Crime news)


सीएने अशोक खरातविरोधात पोलिसांना काय सांगितलं ?
जुलै 2017 ते ऑगस्ट 2024 पर्यंत अशोक खरातने सीएची फसवणूक केली. आईवडिलांची मृत्यूची भीती घालून मृत्यू योग टाळण्यासाठी अवतार पूजा विधीच्या नावाने त्याची फसवणूक करण्यात आली. भोंदू खरातने गंडांतराचा योग टाळण्यासाठी पूजा करण्याचे सांगून 8 कोटी 76 लाख पाच हजार पाचशे साठ सातशे रुपयांची खंडणी स्वरूपात रक्कम सीएकडून वसूल केली. पुढे एका बँकेच्या अधिकाऱ्याची आणि सीएची मैत्री कामानिमित्त झाली, त्यातून अशोक खरातची ओळख झाली.


अशोक खरातला (Ashok Kharat)समुद्र शास्त्र अवगत आहे आणि सिद्ध शक्ती प्राप्त आहे तो अंकशास्त्रातला आणि ज्योतिषी शास्त्र आणि धार्मिक अनुष्ठानच्या आधारे भाकीत सांगतो, असे त्यांनी सांगितलं. मोठमोठे व्यवसायिकांना त्याने लाभ मिळवून दिला आहे. दैवी शक्तीच्या अनुष्ठनाद्वारे व्यवसायात यश मिळेल, असं प्रलोभन दाखवले. सीएने जन्माची कोणतीही माहिती दिली नाही. मात्र, अशोक खरातने त्याबद्दल त्याला सांगितल्याने त्याचा खरातवर विश्वास बसला.


पुढे सीएने पोलिसांना सांगितले की, मी माझ्या घरी त्याला बोलवले आणि घराच्या बाहेर गप्पा मारत असताना खरातने अचानक मूठ बंद करून उजव्या हातातून काजू कतली काढली आणि मला म्हणाला हा घ्या प्रसाद, त्यातून मला खरातकडे दिव्यशक्ती असल्याचं ठाम विश्वास बसला. माझा एक मित्र अशोक खरातकडे जात होता. मात्र, खरातने मला सांगितले तुझ्या मित्राला कॅन्सर होईल आणि त्याचा मृत्यू होईल, योगायोगाने तसेच घडलं आणि माझा विश्वास दृढ झाला. त्यानंतर अशोक खरात सांगेल ती पूर्व दिशा असं मी वागत गेलो.अशोक खरातने मला एकदा विचारले, तुला काय पाहिजे आहे तर मी सांगितले की, व्यवसायात वृद्धी आणि आई-वडिलांची प्रकृती. त्यांनी मला दोन पूजा सांगितल्या आई-वडिलांसाठी अवतार पूजा आणि व्यवसायासाठी सिद्ध पूजा .


मी घाबरलो आणि पूजेसाठी तयार झालो, त्याने मला सांगितलं की तुम्हाला गंडांतर योग आहे. आई-वडिलांचा मृत्यू आणि व्यवसायात मोठे संकट उभे राहील. हा योग टाळण्यासाठी त्यांनी मला एका धार्मिक संस्थेचा विश्वस्त होणे आवश्यक असते, असे सांगितले. त्यानुसार मी शिवानिक ट्रस्टचा विश्वस्त झालो.अशोक खरात याने सांगितल्यानुसार, मी 2019 मध्ये शिवनिका संस्थांमध्ये मी सदस्य झालो. संस्थेच्या कामकाजात कोणताही हस्तक्षेप केला नाही. मात्र, 2025 मध्ये मी स्वतःहून पदाचा राजीनामा दिला. 2023 मध्ये खरातने मला आईच्या दीर्घायुष्यासाठी अवतार पूजेची वेळ आली आहे आणि ती करावी लागेल असे सांगितले.मीरगाव येथे ही पूजा करायची ठरली आणि तेथून वावी गावाजवळ अशापीर बाबा दर्गात अवतार पूजा सांगून पाच कोटी रुपये घेतले.


आईच्या मृत्यूचा योग येईल असे घाबरून मी लगेच भावाच्या बँक खात्यामधून चार कोटी पंचवीस लाख दिले.दहा दिवसानंतर अशोक खरातने वावी गावाजवळ अशापीर बाबा दर्गात डोंगरावर रात्री सात वाजता पूजा केली.हातावर तांदूळ देऊन डोळे बंद करून गायत्री मंत्र म्हण्याला सांगितला. आशापीर बाबा नागरुपात येऊन दर्शन देईल सांगितले. मंत्राचा जप करून मी दोन मिनिटानंतर डोळे उघडले आणि मला तेथे एक नाग दिसला. नाग खरा होता की खोटा आहे, मला अंधारात समजले नाही. पुढे येऊ नका नाग चावेल, असे सांगून मला तुला काय पाहिजे, असे विचारले. आईच्या दीर्घायुष्यासाठी महाशिवरात्री आणि श्रावण महिन्याच्या दर सोमवारी मला ईशान्यश्वर मंदिरात अन्नदान करण्यासाठी सांगितले. मला तर सोमवारी अंदाजे एक लाख रुपये खर्च यायचा. अशोक खरात मुंबईला यायचा तेव्हा मला हॉटेल आणि राहण्याची सोय तसेच गाडीची व्यवस्था करायला सांगायचा.


2024 मध्ये अशोक खरातने(Ashok Kharat)  सांगितले शक्तीपीठ महामार्ग एका जागेतून जाणार आहे. ती जागा तुम्ही खरेदी करा, महामार्ग गेला की मोठा फायदा तुम्हाला होईल, मात्र त्याचे भाकीत खोटे ठरले.मी पुन्हा नाशिकला त्याच्याकडे गेलो आणि सांगितले आईच्या जीवाला काही धोका तर नाही ना, तर त्याने सांगितले आईच्या जीवास धोका नाही, मात्र वडिलांचा मृत्यू योग आहे. वडिलांसाठी पुन्हा अवतार पूजा करावी लागेल, मी पुन्हा घाबरलो आणि त्याला सांगितले की पूजा करू. त्रिवेंद्रम येथील समुद्रकिनारी जुलै महिन्यात अवतार पूजा करावी लागेल त्यासाठी पाच कोटी रुपये इतका खर्च सांगितला. मी त्याला सांगितले की, एवढे पैसे नाहीत. मात्र, मी पुन्हा त्याला दोन कोटी 53 लाख 55 हजार रुपये दिले. उर्वरित पैसे पूजेनंतर देतो सांगितले. प्रत्येकवेळी मला आई-वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवून कोट्यावधी रुपये घेतले. मला त्याच्या दैवी शक्ती आणि अध्यात्माबाबत संशय आला.


मी अशोक खराची गुप्तपणे माहिती काढायची ठरवली, त्याला एका कुकची गरज असल्याचं मला समजलं. मी तिथे त्याच्या फार्म हाऊस वर माझा एक माणूस कूक म्हणून पाठवला.माझ्या माणसाने अशोक खरातचा विश्वास संपादन केला, त्याची माहिती काढण्यास सुरुवात झाली. 2024 मध्ये अशोक खरात त्याचा एक विश्वासू आणि मी आम्ही तिघे तिरुवंतपुरम येथे विमानाने गेलो हॉटेल बुक केले. पुन्हा सात वाजायच्या सुमारास समुद्रकिनारी खरातने थोडे तांदूळ हातावर देऊन डोळे बंद करत गायत्री मंत्र म्हणायला सांगितला समुद्रातून नाग येत आहे असे अशोक खरातने सांगितले. डोळे बंद करून आम्हाला अंधार असलेल्या समुद्रकिनारी पाहायला सांगितलं. समुद्राच्या पाण्यातून नाग सदृश्य हालचाल दिसली आणि मला नागदेवतेला प्रार्थना करायला सांगितले.मी हात जोडून प्रार्थना केली आणि वडिलांचे आयुष्य पंधरा वर्षांनी वाढले, असे अशोक खरातने मला अवतार पूजा करून म्हटलं. मात्र, मी दिनेश परब नामक असलेल्या आमच्या सोबतच्या व्यक्तीला हे विचारलं आणि त्याने मला संमिश्र उत्तर दिले.


कुकने दिली अनैतिक कृत्यांची माहिती


उरलेल्या पैशांसाठी खरात मला तगादा लावत होता, पूजेचे वेळी काही गोष्टी मला खटकल्या आणि मी पैसे देण्याची इच्छा नसल्याचं सांगितलं. मात्र मला सतत पैसे देण्यास तगादा लावून अशोक खरातला मी पुन्हा एक कोटी पन्नास हजार रुपये आणि त्याच्या कल्पना खरातच्या बायकोच्या नावावर 97 लाख रुपये पाठवले. मला मात्र त्याच्या विरोधात नकारात्मक भावना निर्माण झाली. एके दिवशी अशोक खरात हा मोबाईल वर पोलिसांसोबत बोलत असल्याचं सांगून त्याने सांगितलं की, पूर्वच्या दिशेला जा तिथे तुम्हाला चोर सापडेल, पण मी त्याचं सर्व बघून त्याचा फोन हा बंद असल्याचा पाहिलं आणि तो आम्हाला प्रभावित करत असल्याचा देखील समजलं. फार्म हाऊसवर एक कुक म्हणून काम करणारा माझा माणूस हा अशोक खरातचा अत्यंत विश्वासू म्हणून काम बघत होता त्यांनी खरातची सर्व अनैतिक कृत्यांबाबत माहिती दिली.फार्म हाऊसवर अशोक खरात काही मुली आणि महिला घेऊन येतो, येण्याच्या आधी सीसीटीव्ही कॅमेरे बंद करायला सांगतो.मुली आणि महिलांसोबत तो दारू पितो आणि नशेत बेडवर लघवी करतो. खरातच्या दारूच्या नशेतील सर्व प्रकार कूकने मला सांगितले.


अशोक खरातला कूकवर संशय येत होता, खरातकडील कूक जाणीवपूर्वक सीसीटीव्ही कॅमेरे बंद करत नव्हता. मुलीशी अश्लील कृत्य कुक बघत होता आणि समजून घेत होता.अशोक खरात हातचलाखी करून चमत्कार, जादू ,नकली साप वापरून भीती दाखवायचा. सिद्ध पुरुष असल्याचे भासवून लोकांना धार्मिक पूजा सांगून त्यांचा गैरफायदा घेत होता आणि त्यातून कोट्यावधी रुपये कमवत होता. माझ्यासारखे अशोक खरातचे असलेले भक्त त्यात राजेंद्र जासूद, दिनेश परब हे देखील माझ्या संपर्कात होते. ऑफिस बॉय मिरज जाधव यानेदेखील ऑफिसमध्ये स्पाय कॅमेरा लावल्याचा आम्हाला माहीत होतं. नीरज जाधवच्या पत्नीसोबत देखील अशोक खरातने अश्लील कृत्य केलं होतं. मुली, महिलांसोबत तो अश्लील चाळे करून खंडणी स्वरूपात कोट्यावधी रुपये कमवत होता.


काहींना आई-वडिलांचा मृत्यूचा धाक, तर गंडांतर योग अवतार पूजा असे सांगून त्याने माझ्यासह अनेकांना लुबाडल्याचे मी समोर आणले. मला अशोक खरातच्या विरोधात तक्रार द्यायची होती. मात्र, मार्च महिना असल्याने माझ्यामागे खूप काम होतं आणि मी पोलीस ठाण्यात जाऊ शकलो नाही. माझ्या मित्राचा मृत्यू नैसर्गिक होता, हे मित्राच्या बायकोने मला नंतर समजावून सांगितले. माझ्या मित्राचा कॅन्सरने मृत्यू होईल हे त्यांनी मला सांगून तो अवतार पुरुष आणि दैवी शक्ती त्याच्याकडे असल्यास मला भासवलं. अशोक खरात हा पूजा विधीच्या नावाने अत्यंत खोटातलं फसवणूक आणि मृत्यू योग गंडांतर योग अवतार पूजा आणि इतर पूजा विधीच्या नावाने त्याने हातचलाखी करून जादू दाखवत माझी 8 कोटी 76 लाख 5 हजार 560 रुपये रक्कम खंडणी स्वरूपात वसूल केली आहे.असे त्याने पोलिसांना सांगितले.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि

Ganeshotsav 2026 Sound Restrictions : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर होणार थेट कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाच्या

Samruddhi Expressway Traffic Diversion : टाकळीवाडीत गॅस वाहिनीला गळती; खबरदारी म्हणून समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळवली

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील टाकळीवाडी येथे गेल कंपनीच्या गॅस वाहिनीला गळती लागल्याने प्रशासनाने