Nitesh Rane : 'मराठीचा आग्रह धरताना हिंदूंमध्ये फूट पाडू नका'

सिंधुदुर्ग : 'प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आमच्या परिवहन मंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेला मुख्यमंत्र्यांचेही समर्थन आहे. जो कोणी महाराष्ट्रात व्यवसाय करतो, त्याने मराठी शिकलीच पाहिजे. उत्तर भारतीय भाऊदेखील मराठी शिकतील. या मुद्द्यावरून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे काम कोणी करू नये. ज्यांना मराठी शिकायची आहे, त्यांना आम्ही प्रशिक्षण आणि पुस्तके देऊ. मात्र, मारण्याची भाषा कोणी करू नये. तसेच मराठीचा आग्रह धरताना हिंदूंमध्ये फूट पाडू नये'; असे मंत्री नितेश राणे म्हणाले. ते सिंधुदुर्ग येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.



संजय निरुपम यांचा विषय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतःच हाताळतील. ते यासाठी सक्षम आहेत, असे एका प्रश्नाच्या उत्तरावेळी मंत्री नितेश राणे म्हणाले.


निर्लज्ज म्हणजे काय हे ज्यांना माहिती आहे त्यांनाच सगळे निर्लज्ज वाटतात. आधी त्यांनी स्वतःकडेच बघावे; असे अन्य एका प्रश्नाच्या उत्तरावेळी मंत्री नितेश राणे म्हणाले. नाव न घेता नितेश राणेंनी संजय राऊतांवर टीका केली.


सिंधुदुर्गच्या नाक्यावर टोल सुरू झाला आहे. पण जिल्ह्यातील गाड्यांना म्हणजेच MH-07 क्रमांकाच्या वाहनांना टोल आकारला जाणार नाही, असे पालकमंत्री या नात्याने नितेश राणेंनी सांगितले. जिल्ह्याला शुक्रवारी वादळाचा तडाखा बसला. वादळाने झालेल्या हानीचा आढावा घेऊन पालकमंत्र्यांनी नियमानुसार आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासन दिले.


Comments
Add Comment

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Xi Jinping : ब्रिक्स परिषदेसाठी शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; ४०० लोकांचे शिष्टमंडळही येणार

बीजिंग : पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे