Punjab Kings : पंजाबचा दिल्ली विरुद्धच्या सामन्यात ऐतिहासिक विजय, सर्वात मोठ्या धावसंख्येचा केला यशस्वी पाठलाग

नवी दिल्ली : पंजाब किंग्सने शनिवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ६ गडी राखून विजय मिळवत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग (रन चेस) करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे.दिल्ली कॅपिटल्सने के.एल. राहुलच्या नाबाद १५२ धावांच्या जोरावर २० षटकांत २ बाद २६४ धावांचा डोंगर उभा केला होता. या महाकाय आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबकडून प्रभसिमरन सिंह आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी धडाकेबाज अर्धशतके झळकावली. त्यांच्या या कामगिरीच्या जोरावर पंजाबने १८.५ षटकांत ४ बाद २६५ धावा करत ऐतिहासिक विजय साकारला.


आयपीएल इतिहासातील हे सर्वात मोठे 'रन चेस' ठरले आहे. विशेष म्हणजे, हा विक्रम यापूर्वीही पंजाब किंग्सच्याच नावावर होता. २०२४ मध्ये त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध २६२ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. आता स्वतःचाच विक्रम मोडीत काढत पंजाबने आयपीएलमध्ये नवा इतिहास रचला आहे.


दिल्ली संघाचा खेळाडू केएल राहुलने शानदार नाबाद शतक झळकावले. त्याने या सामन्यात १५२ धावांची ऐतिहासिक खेळी केली. आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही भारतीय फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी हा विक्रम अभिषेक शर्माच्या नावावर होता, ज्याने गेल्या हंगामात पंजाबविरुद्ध १४१ धावांची खेळी केली होती.दिल्लीकडून नीतीश राणाने ९१ धावांचे योगदान दिले. राहुल आणि राणा यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी २२० धावांची विक्रमी भागीदारी झाली.


इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत पंजाब किंग्सने शनिवारी दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्याच घरच्या मैदानात अरुण जेटली स्टेडियममध्ये पराभवाचा धक्का दिला. पंजाबने ६ विकेट्सने विजय मिळवला आहे. हा ७ सामन्यांतील ६ वा विजय आहे. त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे ते अद्यापही अपराजित आहेत. ७ सामन्यात अपराजित राहणारा त्यांचा पहिला संघ आहे. या सामन्यात दिल्लीने पंजाबसमोर २६५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग पंजाबने १८.५ षटकातच पूर्ण केला. त्यामुळे त्यांनी इतिहास रचला आहे. टी२० क्रिकेटमध्ये यापूर्वी कधीही इतक्या मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग झालेला नव्हता. त्यामुळे पंजाब किंग्स टी२०क्रिकेटमध्ये सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणारा संघ ठरला आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघांकडून तब्बल ५२९ धावा काढल्या गेल्या. हाही एक विक्रमच ठरला आहे.


२६५ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबसाठी कर्णधार श्रेयस अय्यर आणि सलामीवीर प्रभसिमरन सिंह यांनी अर्धशतके झळकावली. प्रभसिमरन सिंहने अवघ्या २६ चेंडूत ७६ धावांची दमदार खेळी केली. तर श्रेयस अय्यरने ३६ चेंडूत ७१ धावांची नाबाद खेळी केली. तसेच य प्रियांश आर्याने ४३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली.


पंजाबची पहिल्या विकेटसाठी १२६ धावांची भागीदारी


प्रभसिमरन आणि प्रियांश यांच्यात पहिल्या विकेटसाठी १२६ धावांची भागीदारी झाली. दिल्लीच्या कुलदीप यादवने २ बळी घेतले, तर अक्षर पटेल आणि विप्रज निगम यांना प्रत्येकी १-१ बळी मिळाला.पंजाब किंग्सने शनिवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ६ गडी राखून विजय मिळवत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग (रन चेस) करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे.दिल्ली कॅपिटल्सने के.एल. राहुलच्या नाबाद १५२ धावांच्या जोरावर २० षटकांत २ बाद २६४ धावांचा डोंगर उभा केला होता. या महाकाय आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबकडून प्रभसिमरन सिंह आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी धडाकेबाज अर्धशतके झळकावली. त्यांच्या या कामगिरीच्या जोरावर पंजाबने १८.५ षटकांत ४ बाद २६५ धावा करत ऐतिहासिक विजय साकारला.


पंजाबने स्वतःचाच विक्रम मोडला


आयपीएल इतिहासातील हे सर्वात मोठे 'रन चेस' ठरले आहे. विशेष म्हणजे, हा विक्रम यापूर्वीही पंजाब किंग्सच्याच नावावर होता. २०२४ मध्ये त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध २६२ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. आता स्वतःचाच विक्रम मोडीत काढत पंजाबने आयपीएलमध्ये नवा इतिहास रचला आहे.

Comments
Add Comment

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या

WCL Season 3 : डब्ल्यूसीएलचा तिसरा हंगाम संयुक्त अरब अमिरातीत होणार

नवी दिल्ली : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स (डब्ल्यूसीएल) आपल्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या हंगामासह परत येण्यास

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)