Friday, April 24, 2026

Nashik Crime : मुलाच्या मृत्यूची भीती दाखवत विधवा महिलेवर अत्याचार, वासनांध खरातला सहाव्या गुन्ह्यात ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी

Nashik Crime : मुलाच्या मृत्यूची भीती दाखवत विधवा महिलेवर अत्याचार, वासनांध खरातला सहाव्या गुन्ह्यात ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी

नाशिक : नाशिक सेक्स स्कँडल प्रकरणात अटक करण्यात आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात ( Ashok Kharat Case) याची कसून चौकशी कसून चौकशी सुरु आहे. एसआयटी चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे त्याने केले आहे. सूत्रांनुसार, अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेला खरात सरकारी डॉक्टरच्या नावाखाली गर्भपाताचे रॅकेटही चालवत होता. तपासात असे उघड झाले आहे की, पीडितांपैकी एकाने सरकारी डॉक्टरच्या मदतीने गर्भपात करून घेतला होता.

दरम्यान भोंदूबाबा अशोक खरात ( Ashok Kharat Case) याच्या विरोधातील सहाव्या गुन्ह्याचा तपास शुक्रवार (दि. २३) पासून सुरू होत आहे. पाचव्या गुन्ह्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात केली असली, तरी नव्या गुन्ह्याच्या तपासासाठी एसआयटी पुन्हा त्याला ताब्यात घेणार आहे.

मुलाच्या मृत्यूची भीती दाखवून विधवा महिलेवर अत्याचार एका विधवा महिलेला तिच्या मुलाच्या मृत्यूची भीती घालून दैवी कोपापासून वाचवण्याच्या नावाखाली खरातने वर्षभर तिच्यावर अत्याचार ( Ashok Kharat Case) केले होते. या पाचव्या गुन्ह्यात पोलिसांनी खरातला १८ एप्रिलपासून कोठडीत घेतले होते. गुरुवारी या कोठडीची मुदत संपल्याने त्याला जिल्हा व सत्र न्यायालयात (Nashik District and Sessions Courts) हजर करण्यात आले. यावेळी सरकारी अभियोक्ता किरण भेंडभर यांनी युक्तिवाद करत सहाव्या गुन्ह्याच्या तपासासाठी खरातची पुन्हा पोलीस कोठडी मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. न्यायालयाने ही विनंती मान्य केल्याने खरातला आज पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता त्याला २६ एप्रिल पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

खरातने पीडित महिलांचा गर्भपात करण्यासाठी शहरातील खासगी डॉक्टर व एका शासकीय अधिकाऱ्याची मदत घेतल्याचा संशय एसआयटीला आहे. या दोन ते चार डॉक्टरांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे

Comments
Add Comment