Everyone Sorry… मोबाईल स्टेट्सवर अखेरचा मेसेज अन् त्यानंतर जे घडलं त्याने काळजाचा थरकापच उडाला

पुणे : Everyone Sorry असं स्टेट्स ठेवलं आणि पुण्यातील २७ वर्षीय तरुण अचानक गायब झाला. कुटुंबीयांची तरुणाला शोधण्यासाठी एकच धावाधाव झाली मात्र दिन दिवसांनी सापडला तो तरुणाचा मृतदेह. पुण्यातील खडकी येथे ही धक्कादायक घटना समोर आली आहे.


नेमकं प्रकरण काय ?


अमर राजेंद्र कदम (वय 27) हा युवक पुण्यातील खडकी येथून गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता. दरम्यान या युवकाचा राजगड तालुक्यातील वरसगाव धरणाच्या बॅकवॉटरमध्ये मृतदेह आढळला. हा तरुण गायब झाल्यानंतर खडकी पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रार दाखल होताच पोलिसांनी शोधाशोध केली, दरम्यान तरुणाचा मृतदेह आढळून आला. या घटनेने कुटुंबावर एकच शोककळा पसरली आहे.


पुण्यातील खडकीतील अमर राजेंद्र कदम (वय 27) हा युवक गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता. याबाबत खडकी पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीस तपासात साईव खुर्द परिसरातील वरसगाव धरणाच्या बॅकवॉटर भागात त्याचे ओळखपत्र, कपडे, मोबाईल आदी वस्तू आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. प्राथमिक पाहणीत संबंधित ठिकाणी पाण्याचा खोल प्रवाह असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार तातडीने शोधमोहीम राबविण्यात आली.


साईव खुर्द परिसरातील वरसगाव धरणाच्या बॅकवॉटर (Varasgaon Dam Backwater) भागात त्यांचे ओळखपत्र, कपडे, मोबाईल आदी वस्तू आढळून आल्याने हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं होतं. त्यानंतर या टीमने खोल पाण्यात शोध घेतला. यावेळी त्याचा मृतदेह आढळून आला. त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्याने ‘Everyone Sorry’ असा स्टेटस मोबाईलवर ठेवला असल्याची माहितीही समोर आली आहे. यावरून अमरने आत्महत्या करण्याचा निर्णय घेऊनच आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. पण त्याच्या आत्महत्या करण्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.

Comments
Add Comment

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

वर्धा : वर्धा  (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला नवा मुहूर्त; वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका!

पुणे : पुण्यातील ट्रॅफिक जॅम, विशेषतः हिंजवडी आयटी पार्क परिसरात होणाऱ्या रोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त