Assembly Election : बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीत ५५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान तर पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूत ८० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान

पुणे : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या २९४ पैकी १५२ जागांसाठी पहिल्या टप्प्यात ९२ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद झाली तर तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या सर्व २३४ जागांवर विक्रमी ८४ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले.दोन्ही राज्यांच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मतदानाची नोंद झाली. महाराष्ट्रात बारामती विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत ५८.२७ टक्के मतदानाची नोंद झाली. तसेच राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत ५६.२० टक्के मतदान झाले.


बारामतीत सकाळी ९ वाजेपर्यंत एकूण ८.१ टक्के मतदानाची नोंद झाली होती. सुरवातीच्या दोन तासांत मतदानाचा वेग काहीसा मंदावल्याचे दिसून आले. सकाळी ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के मतदान झाले होते. सकाळच्या टप्प्यात मतदानासाठी रांगा दिसून आल्या. त्यानंतर दुपारच्या टप्प्यात कडक उन्हामुळे मतदानाचा वेग काहीसा मंदावला. दुपारी १ वाजेपर्यंत ३१.९१ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर दुपारी ३ वाजेपर्यंत ४०.३६ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५२.४४ टक्के मतदान झाले होते. मतदानाची वेळ संपली तरी बारामतीच्या ग्रामीण भागात मतदानासाठी रांगा लागलेल्या होत्या. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडत असून कोणताही मोठा अनुचित प्रकार घडलेला नाही, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह आमदार रोहित पवार, जय पवार, पार्थ पवार यांनीही मतदानाचा हक्क बजावला.


राहुरी विधानसभा पोटनिवडणूकीसाठी गुरुवारी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. शहरी भागाच्या टक्केवारीत ग्रामीण भागातीलही टक्केवारी बरोबरीत तर काही ठिकाणी वाढल्याचे पहावयास मिळाले. सकाळच्या सत्रात मतदानाची टक्केवारी काहिशी संथ जाणवत असली तरी मात्र ९ नंतर या टक्केवारीत बऱ्यापैकी आघाडी घेतल्याचे चित्र होते. उन्हाच्या तप्त काहिलीत मतदानाचा टक्का घसरला. मात्र तो, दिवस सरता-सरता सावरल्याचेही निवडणूक विभागाच्या आकडेवारीनुसार दिसले. काही ठिकाणी नेहमीप्रमाणे ईव्हीएम मशीनच्या खोळंब्याने मतदानात खोडा घातला. तर किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडल्याचे प्रशासनाने सांगितले.


सकाळी ७ ते ११ या वेळेत १८ टक्क्यांपेक्षा जास्त मतदारांनी हक्क बजावला होता. नंतर उन्हामुळे मतदानाच्या वेगावर थोडा परिणाम झाला. पण दुपारच्या उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतर पुन्हा मतदानाचा वेग वाढला. अखेर राहुरीत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ५५.३१ टक्के मतदान झाले. भाजपचे उमेदवार अक्षय कर्डीले आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे , उबाठाचे बंडखोर अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके आणि इतर अपक्ष तीन उमेदवार यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

Comments
Add Comment

Nitesh Rane : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; मंत्री नितेश राणेंची गर्जना

मुंबई : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; अशी गर्जना मंत्री नितेश राणे यांनी केली. ते हिंदू रक्षक

CM Devendra Fadnavis : 'भारताचे संविधान आणि लोकशाही प्रत्येक व्यक्तीला मोठी संधी देऊ शकते'

नागपूर : तरुणांना मुख्यमंत्री किंवा

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग

Dog Attack : दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

बीड : बीड शहरातील शिवतेज नगर भागात रेणू हॉस्पिटल परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी