Raja Shivaji : राजा शिवाजी मधील अफझलखानाची भेट आणि जोरदार टीकास्त्र; रितेशने नेमकं दाखवलं आहे तरी काय ?

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत, राजांच्या अनेक गोष्टी प्रत्येक मराठी माणूस हा लहानपणापासून ऐकत आला आहे, सुरुवातीला आलेल्या राजा शिवछत्रपती या सिनेमामुळे महाराजांचे शौर्य, कर्तृत्व आपल्याला अधिक कळले, त्यानंतर थेट मी शिवाजी राजे भोसले बोलतोय या सिनेमामुळे मराठी माणसाचं रक्त खवळल. यानंतर अनेक सिनेमे आले, महाराजांच्या वेगवेळ्या बाजू, युद्धनीती, गनिमी कावा यांवर प्रकाश टाकला गेला.


आता महाराजांचा आणखीन एक सिनेमा येत आहे. रितेश देशमुख यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा बहुप्रतीक्षित चित्रपट 'राजा शिवाजी', या चित्रपटाचा ट्रेलर २० एप्रिल रोजी प्रदर्शित झाला असून एका प्रसंगामुळे अनेक टीका, आरोप होत आहेत.



या प्रसंगामुळे झाला वाद 


राजा शिवाजी या सिनेमात अनेक कलाकारांनी यात महत्वाच्या भूमिका साकारल्या असून. संजय दत्त हा अफझलखान ची भूमिका साकारली आहे.


अफझलखान वधाचा तो प्रसंग :  रितेश देशमुखच्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शिवाजी महाराज आणि अफझलखान यांची भेट होते. अफझलखान हल्ला करण्यापूर्वीच महाराज त्याला वाघनख दाखवतात आणि वार त्याच्या मानेवर करतात.



मूळ इतिहासात काय सांगितले आहे


इतिहास जो आपण वाचत आलोय त्यावरून महाराजांवर आधी अफझलखानवर वार केला त्यांना मिठी मारून खाकेत दाबले, महाराजांवर आधी अफझलखानाने वार केले , चिलखत होते म्हणून महाराज बचावले त्यानंतर महाराजांनी वाघनखांनी वार करून अफझलखानाच पोट फाडलं.



टीकेची झोड


हा ट्रेलर लाँच होताच सोशल मीडियावर टीकेची झोड उठले आहेत, इतिहास रितेश देशमुख का बदलत आहेत? इतिहासाशी छेडछाड का करत आहेत? आणि चुकीचा इतिहास लोकांना का दाखवत आहेत? महाराष्ट्राच्या इतिहासाचा, वारशाचा आणि अभिमानाचा का अपमान करत आहेत? असे प्रश्न विचारले जात आहेत.



रितेश देशमुख यांचे उत्तर


रितेश देशमुखने सोशल मीडियाच्या माध्यमातून या टीकांचे उत्तर देत लिहिलं आहे की 'प्लीज १ मे रोजी चित्रपट नक्की पहा... तुमच्या प्रश्नच उत्तर चित्रपटाचं आहे, मला आशा आहे की, तुम्ही तुमचे मित्र आणि कुटुंबासोबत चित्रपटाचं आनंद घ्याल. जय शिवराय

Comments
Add Comment

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर

Sara Tendulkar : मला माझ्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये हवाय असा गुण... सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरचा मोठा खुलासा!

भारतीय क्रिकेटचा देव मानले जाणारे सचिन तेंडुलकर यांची लाडकी लेक सारा तेंडुलकर ही नेहमीच चाहत्यांच्या आणि सोशल

Govinda On Salman Khan: 'पाटर्नर, तू हिरोसारखा दिसत नाहीस...' गोविंदाचं 'ते' वक्तव्य अन् सलमान खानचं नशीब बदललं

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आपल्या खासगी आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने

Dil Chahta Hai completes 25 years : तरुणाईला वेड लावणारा तो एव्हरग्रीन सिनेमा आणि आजही कायम असलेली 'त्या' गाण्याची क्रेझ!

बॉलीवूडमध्ये काही चित्रपट असे असतात, जे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता प्रेक्षकांच्या आयुष्याचा आणि

AR Rahman Son Accident : प्रसिध्द संगीतकार ए.आर. रहमान यांच्या मुलाचा कार अपघात; थोडक्यात बचावला आमीन

चेन्नई : प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान (A R Rahman) यांचा मुलगा आणि गायक ए.आर. आमीन (A R Ameen) याचा कार अपघात झाल्याची धक्कादायक

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट