Multipurpose Use : महसूलवाढीसाठी कोल्हापूर चित्रनगरी व एन. डी. स्टुडिओचा बहुउद्देशीय वापर करणार

मुंबई : राज्यातील चित्रपट, दूरदर्शन मालिका व जाहिरातींच्या चित्रीकरणास कोणताही अडथळा न आणता कोल्हापूर चित्रनगरी तसेच कर्जत येथील एन. डी. स्टुडिओ परिसरात विवाह सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर समारंभांसाठी जागा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देता येईल का, याबाबत अभ्यास करून स्वतंत्र धोरण तयार करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.


महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ (फिल्मसिटी) संचालक मंडळाची १६८ वी बैठक आज मुंबईतील पुल देशपांडे कला अकादमी च्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध प्रशासकीय व विकासात्मक मुद्द्यांसह महसूलवाढीच्या दृष्टीने नव्या उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मंत्री शेलार यांनी उपलब्ध अधोसंरचनेचा अधिक प्रभावी व नियोजनबद्ध वापर करण्यावर भर दिला. चित्रनगरीचा आगामी वर्षांचा १८ कोटी महसूल वाढीचा आर्थिक ताळेबंद मंजूर झाला.


राज्यातील चित्रनगरी व स्टुडिओ संकुलांमध्ये आधुनिक सुविधा, प्रशस्त मोकळी जागा आणि आकर्षक लोकेशन्स उपलब्ध आहेत. या सुविधांचा वापर नियोजनपूर्वक केल्यास चित्रीकरणाच्या कामावर परिणाम न होता पूरक स्वरूपात विवाह सोहळे, कॉर्पोरेट कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम आदींसाठी जागा उपलब्ध करून देता येऊ शकते. यामुळे संस्थेच्या महसुलात लक्षणीय वाढ होण्यास मदत होईल, असे यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले. यासाठी स्वतंत्र धोरण तयार करताना चित्रीकरणास प्राधान्य देत वेळापत्रकाचे काटेकोर नियोजन, स्वतंत्र झोन निश्चिती, कार्यक्रमांसाठी परवानगी प्रक्रिया, भाडे दरांची पारदर्शक रचना, ऑनलाईन बुकिंग प्रणाली, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक व पार्किंग नियोजन, स्वच्छता व देखभाल यांसारख्या सर्व बाबींचा सविस्तर विचार करावा, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच, स्टुडिओमधील तांत्रिक उपकरणे, सेट्स आणि सर्जनशील वातावरण सुरक्षित राहील यासाठी आवश्यक ती काळजी घेणे बंधनकारक राहील, असेही त्यांनी सांगितले.


बहुउद्देशीय वापरामुळे चित्रनगरी आर्थिकदृष्ट्या लाभदायी ठरतील. स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास आणि पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल, असा विश्वास मंत्री शेलार यांनी व्यक्त केला. या बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, वित्तीय सल्लागार तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी चित्रलेखा खातू तसेच बैठकीस महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, संचालक मंडळाचे सदस्य तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी

Kapuskonda Movie : सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले यांचा 'कापूसकोंडा' येतोय २३ ऑक्टोबरला

मुंबई : माणूस आणि प्राणी यांच्यातील भावभावना, नातेसंबंधांचे धागे मनोरंजक पद्धतीने उलगडणाऱ्या "कापूसकोंडा" या