Eknath Shinde : 'गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरीत पूर्ण करा'

मुंबई : भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरीत पूर्ण करून टप्पा दोन बाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे यासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार नरेंद्र भोंडेकर, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव गोविंदराज, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे उपस्थित होते तर जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी, गोसीखुर्द मुख्य अभियंता दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.


उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटनाच्या कामाचा आढावा घेतला. टप्पा एक मध्ये सुरू असलेल्या जेट्टीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. दुसरा टप्प्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेऊन शासनाकडे त्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी केल्या.


यावेळी नागपूर ते भंडारा रोड या दरम्यान धावणाऱ्या ब्रॉडगेज मेट्रोबाबतही चर्चा करण्यात आली. ही मेट्रो सेवा भंडारा शहरापर्यंत नेण्यात यावी, अशी मागणी आमदार भोंडेकर यांनी केली. त्यानुसार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संबधित अधिकाऱ्यांना महारेल, रेल्वे बोर्ड यांच्याकडे पाठपुरावा करण्याबाबत निर्देश दिले. मेट्रो सेवा भंडारा शहरापर्यंत नेल्यास त्याचा फायदा जिल्ह्याला होईल, असेही शिंदे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम

Anil Kakodkar : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती

- 'जीएमआरटी' दुर्बिणीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणार; ६० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई :

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर