राज्य सहकारी बँक आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी Rohit Pawar दोषमुक्त

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार आणि इतर १६ आरोपींना मुंबई सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला असून, न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केले आहे. हा निर्णय आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणातील मूळ एफआयआर बंद करण्यासाठी दाखल केलेला 'क्लोजर रिपोर्ट' न्यायालयाने स्वीकारल्यानंतर न्यायालयाने घेतला आहे. शिखर बँकेने २००७ ते २०१७ दरम्यान साखर कारखाने आणि सूत गिरण्यांना दिलेल्या कर्जवाटपात २५ हजार कोटी रुपयांचा अनियमितता झाल्याचा आरोप होता. रोहित पवार यांच्या 'बारामती ॲग्रो' कंपनीने कन्नड सहकारी साखर कारखाना लिलावात खरेदी केल्याचा व्यवहारही ईडीच्या तपासाच्या कक्षेत होता.ज्यातून आता त्यांना दिलासा मिळाला आहे. सक्तवसुली संचालनालयाने या दोषमुक्ती अर्जाला विरोध केला होता आणि हा निर्णय गुणवत्तेच्या आधारे घेण्यात यावा, अशी मागणी केली होती. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश महेश जाधव यांनी सर्व १७ आरोपींचे दोषमुक्तीचे अर्ज स्वीकारले आणि हे प्रकरण पूर्णपणे निकालात काढले.यापूर्वीच या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवरील गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेने बंद केले होते. या निर्णयामुळे रोहित पवार यांना मोठा कायदेशीर दिलासा मिळाला असून, गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाला आता पूर्णविराम मिळाला आहे.

Comments
Add Comment

'Kumbh Bhakti Sangam' : नाशिकमध्ये शुक्रवारपासून कुंभ भक्ती संगम, मुख्यमंत्री करणार उद्घाटन

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आयोजित तीन दिवसीय ‘कुंभ भक्ती संगम’ची तयारी पूर्ण झाली

Helpline : नेपाळच्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या नातलगांसाठी हेल्पलाईन

मुंबई : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे किमान ५०० प्रवासी

Beed Crime : आष्टीत एकाच रात्री तीन अल्पवयीन मुलींचे बालविवाह; १२ जणांविरुद्ध गुन्हा

बीड : कायद्याची भीती न बाळगता आष्टी तालुक्यातील कानडी बुद्रुक येथे एकाच रात्री तब्बल तीन अल्पवयीन मुलींचे

MPSC paper leak : पेपरफुटी प्रकरणात सहा जणांना अटक, २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी; एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांचाही समावेश

मुंबई : अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली संपूर्ण

Nepal's flood situation : नेपाळमधील पूरस्थितीवर पंतप्रधान मोदींची बालेन्द्र शाह यांच्याशी चर्चा, भारताकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

नवी दिल्ली : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

UP : उत्तरप्रदेशमध्ये आई-वडिलांशी दुर्व्यवहार करणारी मुले संपत्तीतून बेदखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश (UP) सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे