मुंबई : महापालिकेच्या एम पूर्व विभागातील आणिक भूखंडावरील रुग्णालय आणि टी विभागातील मुलुंडमधील घनकचरा व्यवस्थापन सुविधा ही आरक्षणे वगळून आता त्याठिकाणी जनावरांचे रुग्णालय तथा पशुनिवारा याबाबतचे आरक्षण टाकण्यात येणार आहे. या दोन्ही ठिकाणचे आरक्षण वगळून त्याठिकाण भटक्या श्वान निवारा केंद्र आणि निर्बिजीकरण केंद्र बांधण्यात येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ०७ नोव्हेंबर २०२५ रोजी दिलेले निर्णय आणि शासनाच्या निर्णयानुसार शैक्षणिक संस्था, रुग्णालये, रेल्वे स्थानके, बस स्थानके व आगार, क्रीडा संकुले इ. परिसरातील भटक्या श्वानांची नसबंदी करून श्वान निवारागृहात कायमस्वरूपी ठेवण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार पशुवैद्यकीय आरोग्य खाते तथा देवनार पशुवधगृहाने आदींच्या परिसरातील भटक्या श्वानांची नसबंदी करून श्वान निवारागृहात कायमस्वरूपी ठेवण्यासंदर्भात महानगरपालिका विभागाअंतर्गत जागांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याप्रमाणे महापालिकेच्या एम पूर्व विभागातील आणिक भूखंडावरील रुग्णालय आणि टी विभागातील मुलुंडमधील घनकचरा व्यवस्थापन सुविधा ही आरक्षण वगळून आता त्याठिकाणी जनावरांचे रुग्णालय तथा पशुनिवारा याबाबतचे आरक्षण टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिका अधिनियमांमध्ये तरतूद नाही तरीही सत्ताधारी पक्षाने उचलले पाऊल मुंबई : मुंबई महापालिकेच्या इतिहासात प्रथमच सभागृहाच्या कामकाजाचे थेट ...
क्षेत्रात भटक्या श्वानांसाठी निवारागृहे स्थापन करण्यासाठी महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या पि शोध घेण्यासाठी प्रमुख अभियंता (विकास नियोजन) कार्यालयास अवगत केले. मुंबई महापालिकेच्या मंजूर विकास आराखडा २०३४ नुसार जनावरांचे तथा गुरांचे रुग्णालय या करीता एक भूखंड एफ/ दक्षिण विभागात आरक्षित असून विकास नियोजन विभागाने ताब्यात घेतलेल्या भुखंडांपैकी या प्रयोजनाकरिता वापरता येऊ शकणार आहे. तसेच'पी/उत्तर' विभागातील ५ टक्के सुविधा भुखंड असुन हा भूखंड कोणत्याही सार्वजनिक प्रयोजनाकरीता आरक्षित नाही. याशिवाय 'एम/पूर्व' विभागातील भुखंड रुग्णालयाकरिता आरक्षित असुन 'एम/पश्चिम' येथील भुखंड महानगरपालिका प्रसुतीगृह महानगरपालिका दवाखाना व आरोग्य केंद्र याकरीता आरक्षित आहे. त्यामुळे 'एम/पूर्व' किंवा 'एम/पश्चिम' येथील भूखंड श्वान निवारागृहाकरिता वापरावयाचा असल्याबाबत 'ना-हरकत' प्राप्त करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागास पत्रव्यवहार करण्यात आला असता, त्यानुसार 'एम/पूर्व' विभागातील आणिक येथील स्थित अंदाजे ८४११.५० चौ.मी. इतके क्षेत्रफळ असलेली जागा श्वान निवारागृहासाठी वापराबाबत 'ना-हरकत' दिलेली आहे.
'टी' विभागातील न.भू.क्र. १३०८ मौजे मुलुंड (पुर्व) या आरक्षित भूखंडावर या पूर्वीच मा. महानगरपालिका आयुक्त ह्यांनी मंजूरी दिल्यानुसार ४२२ चौ. मी. इतके क्षेत्रफळ असलेल्या जागेत महापालिकेने श्वान निंबीजीकरण केंद्र व्ही- टिम या प्राणी कल्याण संस्थेमार्फत् स्थापित केले आहे. तेथेच लगत असलेल्या अंदाजे ३००० चौ.मी. इतके क्षेत्रफळ असलेला भूखंड महानगरपालिकेच्या श्वान निवारागृहे करिता पशुवैद्यकीय आरोग्य खाते तथा देवनार पशुवधगृहाला 'मा-हरकत' प्राप्त झाली आहेत.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागाच्या सहायक आयुक्तांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील रस्ते स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, नाले ...
भूखंडावर श्वान निवारागृहे महानगरपालिकेमार्फत बांधण्यास किंवा सार्वजनिक भागीदारी तत्वावर कमीत कमी १० वर्षासाठी स्वारस्य अभिव्यक्ती मागवून या प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे 'टी' विभागातील न. भू. क्र. १३०१ ऐवजी न. भू. क्र. १३०८ हा भूखंड सद्यस्थितीतील वापरानुसार प्रस्तावित श्वान निवारागृह या प्रयोजनाकरिता योग्य असल्याचे सबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. परंतु, या भूखंडापर्यंत पोहचण्याकरिता थेट प्रवेश मार्ग अस्तित्वात नाही. त्यामुळे या भूखंडालगतचा भूखंड न.भू.क्र.१३०४ (भाग) व न.भू.क्र.१३०५ (भाग) हा २७.४५मी. रुंद प्रस्तावित विकास नियोजन रस्त्याने बाधित असल्याकारणाने मुलुंड पूर्व येथील हे तीनही भूखंड मिळून एकूण ३०००.०० चौ. मी. क्षेत्रावर श्वानांचे निवारा केंद्र उभारण्यात येणार आहे.






