Manipur Earthquake : मणिपुरमध्ये ५.२ रिश्टर तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट

मणिपुरच्या अनेक भागांमध्ये आज म्हणजेच मंगळवार २१ एप्रिल रोजी पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ५.२ इतकी नोंदवण्यात आली असून, त्याचे केंद्र कामजोंग जिल्ह्यात होते.


नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या माहितीनुसार, हा भूकंप सकाळी ५.५९ वाजता झाला. धक्के जाणवताच कामजोंग आणि आसपासच्या भागातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आणि अनेकजण घाबरून घराबाहेर पडले. भूकंपाचे केंद्र अक्षांश २४.७०३ उत्तर आणि रेखांश ९४.४१५ पूर्व येथे, सुमारे ६२ किलोमीटर खोलीवर असल्याचे सांगण्यात आले. या धक्क्यांचा परिणाम शेजारच्या नागालँड आणि आसाम राज्यांमध्येही जाणवला.



सुदैवाने, या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या नुकसानीची माहिती मिळालेली नाही. यापूर्वी सोमवारी उत्तराखंडमधील पौडी गढवाल येथे रात्री ८.३२ वाजता रिश्टर स्केलवर ३ तीव्रतेचा भूकंप झाला होता, ज्याचे केंद्र सुमारे १० किलोमीटर खोलीवर होते. तसेच सोमवारी सकाळी जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपामुळे समुद्रात सुमारे ८० सेंटीमीटर उंच लाटा उसळल्या आणि किनाऱ्यावर आदळल्या. त्यानंतर जपानमध्ये सुनामीचा इशाराही देण्यात आला होता.

Comments
Add Comment

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी