Chandrashekhar Bawankule : देवस्थान इनाम जमिनींबाबत येत्या अधिवेशनात कायदा - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

- रोपवाटिकांसाठीच्या मातीला रॉयल्टी माफ



मुंबई : देवस्थान इनाम जमिनींचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकार विधिमंडळाच्या येणाऱ्या अधिवेशनात कायदा करणार आहे. याबवतची तयारी सुरू झाली असून, नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना नोंदविण्यासाठी कायद्याचा मसुदा लवकरच संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी सांगितले.


रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील ऐतिहासिक पेढे परशुराम देवस्थानच्या इनामी जमिनींचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात महसूलमंत्र्याच्या दालनात झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. बैठकीला आमदार शेखर निकम, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदाल आणि महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


देवस्थान जमिनींबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. नवीन कायद्याची प्रक्रिया राबवताना लोकभावना आणि तांत्रिक बाबींचा विचार केला जाणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना आणि संबंधित पक्षकारांना आपली मते मांडता यावीत, यासाठी ही माहिती ऑनलाइन उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले.



फळबागांच्या 'पीकपाणी' नोंदीत बदल :


कोकणातील फळबागायतदारांसाठीही या बैठकीत एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला. फळबागांचे पीकपाणी नोंद दरवर्षी करण्याऐवजी ते दर तीन वर्षांनी करण्यात यावी, यासाठी जमाबंदी विभाग व फलोत्पादन विभागाने संयुक्त प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना महसूलमंत्र्यांनी दिल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा दरवर्षीचा प्रशासकीय त्रास कमी होण्याची शक्यता आहे.



रोपवाटिकांसाठी मातीवरील रॉयल्टी माफ होणार :


जिल्ह्यातील रोपवाटिका चालकांसाठी माती उपलब्ध करून देताना त्यावर कोणतीही रॉयल्टी आकारली जाऊ नये, असा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश महसूलमंत्र्यांनी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील फळबाग लागवडीला आणि रोपवाटिका व्यवसायाला मोठी चालना मिळण्याची चिन्हे आहेत.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : सुट्या खाद्यतेल विक्रीबाबत 'एसओपी' तयार करा! मुख्यमंत्र्यांची 'एफडीए'ला सूचना

- छोट्या व्यापाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत मध्यम मार्ग काढण्याचे निर्देश मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

US Visa Interview : अमेरिका जाण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; व्हिसा इंटरव्ह्यू अपॉइंटमेंटवर अनिश्चित काळासाठी ब्रेक

नवी दिल्ली : अमेरिकेला जाण्याचे नियोजन करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे

Islamabad Hospital Fire : इस्लामाबाद रुग्णालयात गायनेकोलॉजी वॉर्डला भीषण आग; अवघ्या एका बाळाला वाचवण्यात यश, १५ चिमुकल्यांचा होरपळून अंत

इस्लामाबाद : वैद्यकीय क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या आणि संवेदनशील मनांना चटका लावून जाणाऱ्या दोन अत्यंत

Bhuleshwar : १५० मीटरवर मिरवणूक थांबली अन्...; 'भुलेश्वरचा राजा' प्रकरणात धक्कादायक गौप्यस्फोट

मुंबई : ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्ती दुर्घटनेच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. २२ फूट उंचीची भव्य

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Mumbai Contractor Suicide : धक्कादायक! मुंबईत कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; थकीत बिलांमुळे मानसिक आणि आर्थिक तणाव?

मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गजानन देवकाते नावाच्या कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची घटना