आठवणींच्या मैफलीत

आशय : वीणा सानेकर


डहाणू जवळ ऐने नावाचे छोटेसे गाव आहे. या गावात वसलेल्या स्नेहनगरीत जाण्याचा योग नुकताच आला. एका बाजूला क्रीडांगण, नवीनच वसलेले कला कुटिर, सर्वत्र हिरवीगार झाडे, सहअध्ययन केंद्र, मध्यभागी बैठक जमवण्यासाठी मस्त जागा…, दुसरीकडे बैठी शाळा, छोटीशी बाग आणि खेळ…! ही स्नेहनगरी वसवणाऱ्या शिक्षणतज्ज्ञ आणि भाषातज्ज्ञ रमेश पानसे यांची भेट म्हणजे समृद्ध करणारा अनुभव! बालशिक्षणात रमलेले पानसे सर शिक्षणाबद्दल तासन् तास बोलू शकतात...’ त्यादिवशी मात्र कवितांच्याच मैफलीचा बेत सरांनी उत्स्फूर्तपणे ठरवला.


सगळे नव्याने उभ्या राहिलेल्या पर्णकुटीत जमले. बैठकीची गोल रचना. दिवे लागल्याने प्रकाशाची पखरण वातावरण सुंदर करत होती. सगळे सुचेल तशा कविता म्हणत होते. किती वेगवेगळ्या कवितांचा आनंद सगळे लुटत होते. सोबत अनिताताईंनी केलेली गरमगरम भजी शामदादा समोर ठेवत होते आणि मैफलीला अधिकच रंग चढत होता.
यानिमित्ताने आपल्या आवडत्या कविता सगळेच आठवत - शोधत होते.


युगामागुनी चालली रे युगे ही कितीदा करावी भास्करा वंचना
कितीकाळ कक्षेत धावू तुझ्या मी कितीदा करू प्रितीची याचना


ही कुसुमाग्रजांची पृथ्वीचे प्रेमगीत कविता, कुब्जा ही इंदिरा संतांची कविता, बा.भ . बोरकरांची कविता, पु. शि.रेगे, सदानंद रेगे, वसंत आबाजी डहाके, गदिमा, शांता शेळके यांची कविता अशा वेगवेगळ्या कविता उपस्थित जयेश, ज्योती, सुषमाताई, स्नेहल, ईशा, पानसे सर अशा सर्वांनीच सादर केल्या. अधूनमधून कुणी स्वतःच्या जपून ठेवलेल्या कविताही सादर करीत होते.


या रंगलेल्या मैफलीत मोजकेच छोटे प्रेक्षक होते. त्यांच्यासाठी विंदा करंदीकरांच्या ‘एटु लोकांचा देश,’ ‘अबबब अबबब केवढा फणस आई’ या बालकविताही सादर झाल्या. मनमोहन नातू, पद्मा गोळे यांच्या कविता ऐकायला मिळणे हा दुर्मिळ आनंद होता. सेल्युलर तुरुंगाची भिंत आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यातील संवाद मनमोहन नातू यांच्या कवितेतून साकारला तर ‘मी एक पक्षीण आकाश वेडी दुज्याचे मला भान मुळी नसे’ ही कविता समर्थ स्त्रीचा आत्मस्वर टिपत होती.


शब्दांमध्ये जगणे पुन्हा,
शब्दांमध्ये मरणे पुन्हा
हे अंतहीन समुद्रसे माझा
परि दुबळा पसा
अशी अवस्था कविता
ऐकताना होत होती.


‘सई माया सजनीले, सैनच पडेना हे व्हराडी लोकगीत’ ऐकणे आणि ताल धरणे हा अत्यंत वेगळाच आनंद होता. लघुअनियतकालिकांच्या चळवळीचे पानसे सर म्हणजे महत्वाचे साक्षीदार. त्या सगळ्या काळातील वाड्मयीन घडामोडीं विषयी पानसे सर मोकळेपणाने बोलत राहिले. सतीश काळसेकर, मनोहर ओक, गुरुनाथ धुरी यांच्यावर सर भरभरुन बोलत. तसेच मराठीच्या विविध प्राध्यापक व लेखक - कवींच्या आठवणी निघत होत्या. शंकर वैद्य सरांचे अध्यापन आणि त्यांची कविता हा सरांचा आवडता विषय. सरांचा ‘दर्शन’ हा कवितासंग्रह या गप्पांमध्ये पुन्हा पुन्हा आठवत राहिला. एम ए च्या वर्गात असताना सरोजिनी बाई वैदय, शंकर वैद्य सर, डहाके सर, गणोरकर बाई, पुष्पा भावेबाई यांचे वर्ग स्मरत होते. अनपेक्षितपणे जमलेली ही मैफिल कवितांची होती, शब्दांची होती, गीतांची आणि गीतकारांची होती, तितकीच ती माणसांच्या अविस्मरणीय आठवणींची होती.

Comments
Add Comment

Majhi Kanya Bhagyashree Yojana : ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेचे फायदे ऐकूनही तुम्ही चकीत व्हाल

Majhi Kanya Bhagyashree Yojana : राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून

Ramai Awas Yojana : घर बांधायला पैसे नाहीत ? मग काळजी कशाला ? 'रमाई आवास' घरकुल योजना आहे ना !

Ramai Awas Yojana : राज्य सरकारने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘रमाई आवास (घरकुल) गृहनिर्माण योजना’ सुरू केली

Luck : चंगळता !

आमचे एक स्नेही आहेत. अगदी खेड्यात बालपण गेलेले असताना स्वकर्तृत्वाने शिक्षण घेतले, शिष्यवृत्त्यांवर शिकून

Lazy Pallu : उन्हाळ्यात वाढली ‘लेझी पल्लू’ची क्रेझ

एकेकाळी साडीचा पदर अगदी चापून-चोपून, नीट प्लेट्स घालून पिनअप करणं हीच एलिगंट फॅशन मानली जायची. पण बदलत्या

Kajuli biswas : संघर्ष आणि नि:स्वार्थ सेवेची कहाणी : काजुली विश्वास

पश्चिम बंगालच्या काजुली विश्वास यांनी गरिबी, उपासमार, बेघरपणा आणि आपल्याच लोकांची उपेक्षा सहन केली, पण या

Abhilasha Barak : मेजर अभिलाषा बराक यांना 'मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर' पुरस्कार

भारतीय लष्करातील धडाडीच्या महिला अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांनी आपल्या कर्तृत्वाने जागतिक पातळीवर देशाचे नाव