'स्थानिक माथाडी भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य द्या'

मुंबई : राज्यात कुठल्याही आस्थापनेत माथाडी कामगारांची आवश्यकता असल्यास त्या ठिकाणी स्थानिक माथाडी भूमिपुत्र असलेल्या कामगारांना रोजगारात प्राधान्य द्यावे, असे निर्देश कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी दिले. मंत्रालयात दापिवली (ता पनवेल जि. रायगड) येथील मे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन या आस्थापनेत स्थानिक माथाडी कामगारांना माथाडी स्वरूपाचे काम मिळण्याबाबत आयोजित बैठकीत बोलत होते. बैठकीला आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, अपर मुख्य सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच.पी तुम्मोड, उपसचिव स्वप्नील कापडणीस, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे अधिकारी, माथाडी बोर्डाचे अधिकारी उपस्थित होते.


कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर म्हणाले, स्थानिक भूमिपुत्र माथाडी कामगारांना रोजगाराच्या हक्कापासून वंचित ठेवले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या शासन निर्णयाप्रमाणे ८० टक्के भूमिपुत्रांना रोजगार दिला पाहिजे. या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी. बीपीसीएल कंपनीने आपल्या मालवाहतूकदारांच्या माध्यमातून नवीन माथाडी कामगारांची मागणी करावी. ही मागणी माथाडी बोर्डाने तत्काळ मान्य करीत नवीन स्थानिक माथाडी भूमिपुत्रांना रोजगार द्यावा. तसेच अशा कंपन्यांना माथाडी बोर्डाकडे माथाडी कामगारांची मागणी करण्यासाठी नोंदणी करण्याची तरतूद करण्यात यावी.


स्थानिकांवर अन्याय होऊ नये किंवा त्यांना रोजगाराच्या संधींपासून डावलले जाऊ नये. स्थानिकांना डावलल्यास ही बाब कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही कामगार मंत्री फुंडकर यांनी दिला. स्थानिक तरुणांच्या रोजगाराच्या मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेता, कंपन्यांशी तातडीने समन्वय साधावा. नियमानुसार स्थानिक तरुणांना रोजगारात सामावून घेण्यासाठी जे प्रयत्न आवश्यक आहेत, ते प्राधान्याने करावेत, असेही कामगार मंत्री यांनी सांगितले.

Comments
Add Comment

BMC : रस्ते अभियंत्यांना महापालिकेने खड्डे शोधण्यासाठी रस्त्यावर पिटाळले

आगमन, विसर्जन मार्ग चालत जावून पाहणी करण्याचे दिले निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : श्री गणरायांचे आगमन येत्या

Ganesh Murti Safety : कार्यशाळेतून निघणाऱ्या मोठ्या गणेशमूर्तींवर पोलिसांची नजर

फिटनेस स्ट्रॅबिलिटीनंतरच आगमन मिरवणुकीचा मार्ग करणार खुला मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत सध्या गणरायांच्या

Cooper Hospital : कुपर रुग्णालयातील एमआयसीयू खाटांची संख्या पोहोचणार ३५वर

- नवीन २५ खाटांचा एमआयसीयू कक्षाची केली जाणार उभारणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) विलेपार्ले येथील कुपर रुग्णालयात

Ration Card E-KYC Online : रेशन कार्डची घरबसल्या E-KYC कशी करायची? मोबाईलवरून अवघ्या काही मिनिटांत प्रक्रिया पूर्ण करा

मुंबई : रेशन कार्डधारकांसाठी E-KYC (Electronic Know Your Customer) प्रक्रिया महत्त्वाची आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गैरप्रकार

1986 Murder Case : चार दशकांपासून पोलिसांना चकवा; 1986 च्या हत्येतील आरोपीसह क्रिकेट पंचावर हल्ला करणाऱ्याला अटक

मुंबई : मुंबई पोलिसांनी अनेक वर्षांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना वेगवेगळ्या प्रकरणांत अटक केली आहे. विशेष

Amul Lactose Free Milk Packaging : दूधाच्या पॅकेटवरून गोंधळ; व्हायरल व्हिडीओनंतर अमूलने दिली स्पष्टीकरण, नेमकं प्रकरण काय?

मुंबई : इंस्टाग्रामवर अमूल लॅक्टोज-फ्री दुधाच्या पॅकेटचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चेला