रॅपिडो ड्रायव्हरचा तरूणीला आक्षेपार्ह मेसेज, म्हणाला... तुझं वय काय ? एकटी राहतेस ? अन् पुढे धक्कादायक घडलं...

गेल्या काही वर्षात ऑनलाईन व्यवहार असो किंवा वस्तू ने-आण करण्याची पद्धत, सर्व काही बदलले आहे. यासोबतच प्रवासासाठी सुद्धा ऑनलाईन कॅब असेल किंवा बाईक टॅक्सी यांचा वापर देखील सर्रास वाढला आहे. पण हे सर्व होत असताना सुरक्षितरित्या सर्व गोष्टी होणे आवश्यक असते. आपला प्रवास कुठल्याही त्रासाशिवाय होणे हा हेतू डोळ्यसमोर ठेऊन आपण ऑनलाईन कॅब असेल, बाईक असेल टॅक्सी असेल हे बुक करतो मात्र या प्रवासात किंवा प्रवासानंतर प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. असाच रॅपिडो सेवेचा लाभ घेतलेल्या अनुष्का नावाच्या मुलीला याचा अनुभव आला आहे.


नेमकं काय घडलं ?
उत्तर प्रदेशातील गाझियाबदामध्ये (Uttarpradesh)अनुष्का नावाच्या मुलीसोबत एक विचित्र प्रकार घडला. अनुष्काने इन्स्टाग्रामवरील तिच्या अकाऊंटवरून हा भयावह अनुभव शेअर केला असून त्यामुळे हा मुद्दा चर्चेत आला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या रात्री तिची रॅपिडोची राईड पूर्ण झाल्यानंतरही त्या ड्रायव्हरने डायरेक्ट व्हॉट्सॲपवर मेसेज करत तिच्याशी संपर्क साधला. तिला तिच्या ड्रॉप पॉईंटवर सोडल्यावरही त्याने तिला मेसेज केला. ” ओळखलं नाहीस का? आत्ता तर ड्रॉप करून आलो” असं त्याने लिहीलं . त्यावर तरूणीने तू रॅपिडो रायडर आहेस का असा सवाल विचारल्यावर त्याने हो असं उत्तर दिलं. एवढंच नव्हे तर पुढे त्याने आणखीही मेसेज केला. “तू खूप क्युट दिसते. ट्रॅडिनशल कपड्यांत छान दिसत होतीस, तुझं वय काय ?” असे मेसेज त्या ड्रायव्हरने पुढे केले. ती एकटी राहते का असंही त्याने जाणून घेण्याचा प्रयत्न त्याने केला, असा दावा संबंधित तरूणीने केला आहे.



अनुष्का सुरुवातीला घाबरली मात्र हिम्मत करून तिने तिची आपबिती इन्स्टाग्रामवर पोस्ट करत सांगितली. तिने एक व्हिडीओ बनवला ज्यात तिने आपबिती सांगत तो व्हिडीओ शेअर केला. तिचा हा व्हिडीओ, रायडरचे ते चॅट्स चांगलेच व्हायरल झाले असून अनेकांनी यावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. रायडरकडे त्या प्रवाशाचा नंबर कसा आला, असा प्रश्नही अनेक जण विचारत आहे. त्यावरूनच प्रवाशांच्या डेटाच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली.


रॅपिडोने घेतली प्रकरणाची दखल
अनुष्काचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून आता तीच्या पोस्टवर रिस्पॉन्स दिला आहे. कंपनीतर्फे अनुष्काच्या कमेंट सेक्शनमध्ये रिप्लाय देण्यात आला असून जे घडलं त्याबद्दल खेद व्यक्त करत, असं वागणं अस्वीकारार्ह असल्याचे कंपनीने स्पष्ट केलंय. तसेच संबंधित “रायडरचे”चे वर्तन म्हणजे सेवा नियमांचे उल्लंघन असल्याचेही नमूद करण्यात आले. या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्यात येणार असल्याचेही कंपनीने पुढे सांगितलं. डीऐम द्वारे तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि राईड ID शेअर करावा, जेणेकरून योग्य ती कठोर कारवाई करता येईल, असंही कंपनीतर्फे सांगण्यात आलं.




Comments
Add Comment

Chhatrapati Sambhajinagar Crime : इन्स्टावर ओळख, चॅटिंग अन् प्रेम; तीन मुलींच्या आईसोबत छत्रपती संभाजीनगरात घडला भयंकर प्रकार

Chhatrapati Sambhajinagar : सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे लोकांशी जोडण्याचे सर्वात मोठे माध्यम बनले आहे. मात्र, याच सोशल

Virar Fake Currency : विरारमध्ये बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश! १ कोटींच्या नकली नोटा जप्त; ३० लाखांत विक्रीचा कट उधळला

वसई : वसई क्राईम ब्रँच युनिट-२ ने मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठी कारवाई करत १ कोटी रुपये दर्शनी मूल्य असलेल्या

Nashik Crime : आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार, प्रकरण दाबण्यासाठी आजीची हत्या ? जिल्ह्यात खळबळ

Nashik Crime News : सिन्नर तालुक्यातुन एक संतापजनक घटना समोर आली आहे. तालुक्यातील वावी परिसरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Crime News : राज्यातले आणखी एक बेकायदा औषधनिर्मिती युनिट उद्ध्वस्त, DRI ची कारवाई

मुंबई : मादक द्रव्ये आणि मनोविकारकारक पदार्थांच्या अवैध उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय तस्करीविरोधात आपली

US and Canada Murders : रक्ताने माखले परदेशातील पाय; अमेरिकेत आणि कॅनडात भारतीय तरुणांचे खूनी खेळ उघड

परदेशात उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीनिमित्त गेलेल्या भारतीयांशी संबंधित दोन अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक

Shalarth ID Scam : नाशिकच्या गुजर हायस्कूलमध्ये गोलमाल, ११ शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल ; नेमके प्रकरण काय ?

Shalarth ID Scam : नाशिकच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडवून देणारा बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास वेगाने सुरु आहे.