El Nino : अल निनोच्या पार्श्वभूमीवर यंदाचा खरीप हंगाम अत्यंत महत्त्वाचा

मुंबई : “खरीप हंगाम २०२६ शेतकऱ्यांसाठी यशस्वी आणि उत्पादनक्षम ठरावा, तसेच सन २०२६-२७ मध्ये सुमारे १४५.२० लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, भात, मका, तूर, उडीद, कापूस व ऊस या प्रमुख पिकांच्या पेरणीचा लक्षांक निश्चित करण्यात आला असून त्यादृष्टीने कृषी विभागाने पूर्वतयारी सुरू केली आहे. खते व बियाण्यांच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यात येत आहे. यंदा एल निनोच्या पार्श्वभूमीवर हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला असून त्याचा शेती क्षेत्रावर होणारा संभाव्य परिणाम, पर्जन्यमानाची स्थिती आणि त्यानुसार पीक पद्धती यावर चर्चा करण्यासाठी खरीप हंगाम २०२६ च्या नियोजनासाठी राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे,” अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.


कार्यशाळा सोमवारी सकाळी साडेदहा वाजता शिवाजीनगर, बालचित्रवाणी शेजारील नव्याने बांधण्यात आलेल्या सारथीच्या सभागृहात सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेस राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे,फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषी राज्यमंत्री अॅड.आशिष जयस्वाल, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह यांच्यासह नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक, स्मार्ट प्रकल्पाचे प्रकल्प संचालक, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक, कृषी विभागाचे सर्व उपसचिव, सर्व कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक, हवामान विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ, कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्थेचे संचालक, सर्व कृषी संचालक, सर्व विभागीय कृषी संचालक, सर्व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, आत्माचे सर्व प्रकल्प संचालक, सर्व जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी, सोलापुर कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी आयुक्तालयातील सर्व सह संचालक, कृषी उप संचालक, काही शेतकरी उपस्थित राहणार आहेत.


कृषी विभागाने तयारीला सुरुवात केली असून या अनुषंगाने राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत खरीप हंगामासाठी करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते व बियाणे वेळेत आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावेत, यासाठी आवश्यक नियोजनाबाबत चर्चा होणार आहे. तसेच जिल्हानिहाय खते व बियाण्यांचा साठा, वितरण व्यवस्था आणि संभाव्य मागणी याचाही आढावा घेतला जाणार आहे. यंदा एल निनोच्या पार्श्वभूमीवर हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला असून त्याचा शेती क्षेत्रावर होणारा संभाव्य परिणाम, पर्जन्यमानाची स्थिती आणि त्यानुसार पीक नियोजनाबाबतही कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे."


बियाण्यांची गरज २०.१७ लाख क्विंटल असून २८.०५ लाख क्विंटल (१३९%) बियाणे उपलब्ध आहे. खरीप हंगाम २०२६ करिता राज्यास ४८.८० लाख मे.टन खतांचे आवंटन मंजूर असून आतापर्यंत २५.१७ लाख मे.टन खते उपलब्ध आहेत.


भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा देशातील पर्जन्यमान हे दीर्घकालीन सरासरीच्या ९२% इतके राहण्याची शक्यता असून ‘एल निनो’ स्थितीमुळे पावसात अनियमितता व दुष्काळ परिस्थिती उद्भवू शकते. या पार्श्वभूमीवर राज्यात हवामान प्रतिरोधक बियाण्यांचा वापर, उताराला आडवी पेरणी, बीबीएफ तंत्राचा अवलंब, शेततळ्यांची निर्मिती, मल्चिंग व सेंद्रिय खतांचा वापर तसेच पाणी बचत करणाऱ्या सिंचन पद्धतींवर विशेष भर दिला जाणार आहे. याकरिता महाकृषि अॅपच्या माध्यमातून हवामानास अनुकूल कृषि तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके कृषि विभागामार्फत घेणे सुरु आहे. तसेच महाविस्तार अॅप, कृषि विभागाचे यु ट्यूब, फेसबुक, एक्स, इन्स्टाग्राम, व्हाट्सअॅप चॅनेल या सोशल मिडियाच्या माध्यमातूनही हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करणे सुरू आहे.


खरीप हंगामपूर्व तयारी करिता क्षेत्रीय पातळीवरील अधिकारी/कर्मचारी यांच्या विभागस्तरीय व उपविभागस्तरीय कार्यशाळा राज्यात सुरू आहे. विभागीय व उपविभागीय कार्यशाळांद्वारे कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ, केव्हीके शास्त्रज्ञ व प्रगतशील शेतकऱ्यांच्या सहभागातून Hands on Training दिली जात आहे. या सर्व उपाययोजनांच्या माध्यमातून कृषि विभाग खरीप हंगाम २०२६ मध्ये हवामानातील अनिश्चिततेशी सामना करण्यास शेतक-यांमध्ये जागरुकता निर्माण करीत आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : महाराष्ट्र-हेसन भागीदारीतून गुंतवणूक, नवोन्मेष, रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना मिळेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र आणि हेसन दरम्यान परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी सामंजस्य

Prakash Abitkar : आरोग्य विभागाचे प्रशिक्षण धोरण जाहीर, प्रशिक्षण प्रणालीमध्ये अमुलाग्र बदल; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या

Mihir Kotecha : मुलुंडमधील १०० हून अधिक बेकायदा चारचाकी हातगाड्यांवर कारवाई करा; आमदार मिहिर कोटेचा यांची मागणी

उच्च न्यायालयाचे आदेश आणि 'झिरो टॉलरन्स' धोरण असूनही बीएमसीच्या टी वॉर्डने तक्रारींकडे दुर्लक्ष केले; महापालिका

Anna Bansode : वांद्रेतील डिजिटल जाहिरात फलकांची चौकशी; ७ दिवसांत बैठक घेण्याचे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश

मुंबई : वांद्रे (पूर्व) येथील टीचर्स कॉलनी, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील एमएसआरडीसीच्या फुट ओव्हर ब्रिजवरील

Ashish Shelar : आदित्य ठाकरेंचा 'दिमागी' नक्षलींशी संवाद वाढलाय?

- मंत्री आशिष शेलार यांचा घणाघात; गणेशोत्सवातील परंपरांवर आक्षेप घेत मर्यादा आणण्याचा प्रयत्न मुंबई :

Mumbai Powai News : दृष्ट काढण्याच्या बहाण्याने घरात शिरला अन्...; पवईत तृतीयपंथीयाचे सोंग घेऊन महिलेवर अत्याचार!

मुंबई : मध्य मुंबईतील पवई परिसरातून एक धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. घरातील वाईट नजर आणि दृष्ट