Sachin Pilgaonkar - Madhurani Gokhale : "कापूसकोंडा" चित्रपटातून तब्बल २२ वर्षांनी सचिन पिळगांवकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र

मुंबई : चंदेरी दुनियेत ब्रेक मिळायला अनेक ऑडिशन्स द्याव्या लागतात. पण हा असा पहिला कलाकार आहे ज्याला ऑडिशन्स न देता थेट सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी गोखले यांच्यासोबत चित्रपटात काम करण्याची लॉटरी लागली आहे ते पण हिरो म्हणून. कोण आहे हा हिरो? या हिरोच नाव आहे "कापूसकोंडा". हा एक गोंडस भुभु - कुत्रा आहे. आणि हेच या चित्रपटाचे मुख्य आकर्षण आहे. आज अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर "कापूसकोंडा’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. "नवरा माझा नवसाचा" या गाजलेल्या चित्रपटात अभिनेते सचिन पिळगांवकर आणि अभिनेत्री मधुराणी गोखले दिसले होते. आता तब्बल २२ वर्षांनंतर "कापूसकोंडा" या आगामी चित्रपटातून पुन्हा एकदा एकत्र आले असून, बऱ्याच काळानंतर या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री मधुराणी गोखले चित्रपटात कमबॅक करत आहे.



जास्वंद एंटरटेन्मेंट्स प्रा. लि. निर्मित "कापूसकोंडा" चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सचिन मोहिते यांचं आहे. सचिन मोहिते, गणेश पंडित, ऋषिकेश तुरई यांनी चित्रपटाची पटकथा, संवादलेखन केलं आहे. सचिन पाटेकर यांनी छायांकनाची जबाबदारी निभावली आहे. संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचे सुमधुर संगीत या चित्रपटाला लाभले असून चित्रपटाच्या गाण्यांना गायक अवधूत गुप्ते, पद्मनाभ गायकवाड यांचा स्वरसाज लाभला आहे. सुहास राणे यांनी ध्वनी तंत्रज्ञ म्हणून काम पाहिले आहे. अभिनेते सचिन पिळगांवकर व अभिनेत्री मधुराणी गोखले यांच्यासह नवीन पिढीतील अभिनेत्री अक्षता पाडगांवकर, जान्हवी तांबट आणि अभिनेता भूषण पाटील अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे. चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण कथानकाची गरज समजून लातूर जिल्ह्यातील अंधोरी या गावी करण्यात आले आहे.


"कापूसकोंडा" चित्रपटाची कथा अत्यंत अनोखी आहे. विशेष म्हणजे चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर प्रेरित आहे. चित्रपटाचा खरा हिरो हा पोस्टरवर दिसत असलेला एक ‘कुत्रा’ असून चित्रपटाचे रंजक कथानक हे एका फॅमिली आणि त्या कुत्र्याच्या भोवती गुंफण्यात आले आहे. मानवी नाते संबंध, कुटुंब, भाव-भावनांवर आधारित ही हळवी गोष्ट प्रत्येकाला आपलीशी वाटणारी आहे. म्हणूनच या चित्रपटाला ए फॅमिली डॉग फिल्म अशी टॅग लाईन देण्यात आली आहे. लेखक, दिग्दर्शक सचिन मोहिते या पुढे मराठीत पहिल्यांदाच एक ‘डॉगव्हर्स "करण्यास उत्सुक आहेत, कामही सुरु आहे.



या चित्रपटाचं कथानक हे अतिशय वेगळे आहे. इतक्या वर्षांच्या माझ्या कारकिर्दीत असे कथानक मी कधी केले नाही. माझ्या भावनानसोबत या चित्रपटाचे कथानक मिळते जुळते असल्याचे मला जाणवले. त्याचप्रमाणे या चित्रपटाचा लेखक, दिग्दर्शक सचिन मोहिते हा मला पहिल्या भेटीतच कमालीचा हुशार वाटला आणि त्याच्यावर विश्वास ठेऊन मी या चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिला असे सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी सांगितले.


चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक सचिन मोहिते सरांनी चित्रपटाची कथा जेव्हा मला ऐकवली तेव्हाच मी या कथेच्या प्रेमात पडली. इतकी गोड, निरागस अशी ही कथा ऐकताना माझ्या मनाला भिडली सोबत वेगळी भूमिका करण्याची संधी मला मिळाली यासाठी मी या चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. कथानक खुपच वेगळ्या धाटणीचं असुनही अगदी सहजपणे मांडलं आहे. सोबत सचिन पिळगांवकर सरांसोबत काम करण्याची मला संधी २२ वर्षांनी मिळणार होती.सचिन सरांसोबत काम करताना अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या असे अभिनेत्री मधुराणी गोखले यांनी सांगितले.


उत्तम कथानकाला तितक्याच सक्षम अभिनयाची जोड असल्यानं हा चित्रपट मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे परंतु त्यासाठी अजून प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार असून लवकरच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात येणार आहे, तेव्हा भेटूया कापूसकोंड्याला लवकरच आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.

Comments
Add Comment

Multiplex : स्पायडरमॅन सिनेमावर कुशल बद्रिके नाराज ; नक्की कारण काय ?

उत्तम कलाकृतींना नेहमीच अमाप प्रेम देणाऱ्या प्रेक्षकांनी मराठी चित्रपटांना नेहमीच चांगला प्रतिसाद दिला आहे.

Rashmika Mandanna Injured : शूटिंगदरम्यान रश्मिका मंदानाला गंभीर दुखापत; ६ आठवडे विश्रांतीचा सल्ला!

मुंबई : दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटसृष्टीची लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) हिच्या चाहत्यांसाठी

Salman Khan and Sanjay Dutt : सलमान खानची संजय दत्तसाठी भावुक पोस्ट; मिठी मारतानाचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले...

मुंबई : बॉलिवूडमध्ये मैत्रीची उदाहरणे दिली जातात, तेव्हा सलमान खान (Salman Khan) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) यांचे नाव सर्वात वर

Mansoon Hacks : पावसाळ्यात फ्रिजमध्ये पाणी जमा होतंय ? मग करा हा उपाय

पावसाळ्यात एक समस्या घरोघरी दिसून येते ती म्हणजे फ्रिजमध्ये पाणी जमा होणे. कधी भाज्यांच्या ट्रेमध्ये पाणी जमा

Mirzapur The Movie : 'मिर्झापूर: द मूव्ही'चा देशभर भौकाल! ट्रेलरनंतर 7-8 शहरांमध्ये मेगा प्रमोशन; चाहत्यांच्या भेटीला पोहोचणार स्टारकास्ट

 Mirzapur The Movie : अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर 'मिर्झापूर: द मूव्ही'चा दमदार टीझर प्रदर्शित झाला असून, आता

सचिन पिळगावकर यांनी सांगितला गौप्यस्फोट "मी म्हातारा होणार नाही..." संजीव कुमार यांच्या निधनामागचे आणि गूढ भविष्याचे रहस्य

मुंबई: बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार आणि अप्रतिम अभिनयाचा अमीट छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते संजीव कुमार (Sanjeev Kumar) यांचे