- घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे तसेच रुग्णालय लवकरच सुरु करण्याचे केंद्रीय मंत्री यांचे आश्वासन
मुंबई : अंधेरी (पूर्व) येथील ईएसआयसी (ESIC) कामगार रुग्णालय गेल्या अनेक वर्षांपासून विविध समस्यांच्या गर्तेत अडकले आहे. या रुग्णालयाचे गेल्या अनेक वर्षापासून कोट्यावधी रुपये खर्च करूनही अद्याप अपूर्ण अवस्थेत असलेल्या नूतनीकरणाचे काम तातडीने पूर्ण करून ते पूर्ण क्षमतेने सुरू करावे, अशी आग्रही मागणी मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रवींद्र वायकर यांनी केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवियांची भेट घेऊन पत्राद्वारे केली आहे. केंद्रीय मंत्री यांनी देखील याची गंभीर दाखल घेऊन या संपूर्ण कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे तसेच रुग्णालयाचे अपूर्ण असलेले काम लवकरच पूर्ण करून ते पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचे आश्वासन दिले.
नाशिकमधील भोंदूबाबा Ashok Kharat अशोक खरात याच्याविरोधात एकामागून एक गुन्हे दाखल होत असून, प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत आहे. महिला अत्याचार, फसवणूक, अमली ...
खासदारांनी केलेल्या प्रमुख मागण्या :
१. रुग्णालयातील 'अंत:रुग्ण सेवा' (IPD) युद्धपातळीवर सुरू करावी. २. ९०% काम पूर्ण झालेला ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स तातडीने कार्यान्वित करावा. ३. मुख्य इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर प्रशासकीय कार्यालयांऐवजी स्त्री-पुरुष रुग्ण कक्ष (Wards) सुरू करावेत. ४. किमान एक आपत्कालीन ऑपरेशन थिएटर आणि ५ आयसीयू बेड्स त्वरित सुरू करावेत. ५. जुन्या कर्मचारी वसाहतीची दुरुस्ती करून नवीन कर्मचाऱ्यांसाठी निवासाची व्यवस्था करावी.
अमरावती : परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी सुरू झाल्यानंतर आता तपासात नवनवीन तथ्ये पुढे येत आहेत. कटातील मुख्य सूत्रधार अयान ...
अशा मागण्याचा हि या निवेदनात समावेश करण्यात आला आहे. "करोडो रुपये खर्च होऊनही केवळ नियोजनाच्या अभावामुळे कामगारांना उपचारांपासून वंचित राहावे लागत आहे. याप्रकरणी तातडीने बैठक बोलावून दोषींवर कारवाई करावी आणि रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करावे," अशी मागणी खासदार रवींद्र वायकर यांनी केली. त्यानुसार हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने लवकरच सुरु करण्याचे तसेच नुतनीकरणाच्या कामात झालेल्या दिरंगाई तसेचघोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन हि केंदीय मंत्री खासदार यांना दिले.






