नाशिकमधील भोंदूबाबा Ashok Kharat अशोक खरात याच्याविरोधात एकामागून एक गुन्हे दाखल होत असून, प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत आहे. महिला अत्याचार, फसवणूक, अमली पदार्थांचा वापर आणि धार्मिक भावना दुखावण्यासारखे आरोप त्याच्यावर करण्यात आले आहेत.
मुंबई : “खरीप हंगाम २०२६ शेतकऱ्यांसाठी यशस्वी आणि उत्पादनक्षम ठरावा, तसेच सन २०२६-२७ मध्ये सुमारे १४५.२० लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, भात, मका, तूर, ...
पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला रविवारी ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. ...
महिनाभरातील घटनाक्रम :
या प्रकरणात गेल्या महिनाभरात अनेक घडामोडी घडल्या असून त्या खालील प्रमाणे आहेत. १७ मार्च - रात्री उशिरा अशोक खरातला अटक १८ मार्च - न्यायालयात हजर, ७ दिवसांची पोलीस कोठडी २० मार्च - प्रकरण SIT कडे वर्ग २२ मार्च - तीन महिलांच्या तक्रारीनंतर गुन्हे दाखल २५ मार्च - अमली पदार्थांचा वापर आणि धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप वाढले २६ मार्च - ५ कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा नोंद ३० मार्च - तिसऱ्या गुन्ह्यात पुन्हा पोलीस कोठडी ८ एप्रिल - आठ महिलांच्या तक्रारी, महत्त्वाचे पुरावे हाती १३ एप्रिल - नाशिक, पुणे, शिर्डी येथे ED चे छापे १५ एप्रिल - चौथ्या गुन्ह्यात पोलीस कोठडी १८ एप्रिल - न्यायालयीन कोठडी १९ एप्रिल - पाचव्या गुन्ह्यात पुन्हा पोलीस कोठडी
सध्या अशोक खरात पोलीस कोठडीत असून, २३ एप्रिल रोजी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.





