Navnath Ban PC : जनताच काँग्रेसला संपवेल, राऊतांनी स्वतःच्या पक्षाची चिंता करावी, नवनाथ बननी सुनावले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील काँग्रेसचा उल्लेख मोजण्यापेक्षा संजय राऊत यांनी ते ज्या पक्षात आहे त्या पक्षाच्या दयनीय अवस्थेची चिंता करावी. देशभरात काँग्रेसला जनतेने नाकारले आहे. लोकसंख्येनुसार खासदारांची संख्या वाढवणे आवश्यक असताना दक्षिणेकडील राज्यांच्या वाढीला विरोध का केला याचे उत्तर राऊतांनी द्यावे, असा रोकडा सवाल भाजपच्या नवनाथ बन यांनी केला.

जनतेने राऊतांचा झेल घेऊन त्यांची विकेट काढली आहे. विधानसभा, महापालिका आणि इतर निवडणुकांत पराभव झाल्याने कोण फेल आहे हे स्पष्ट झाले आहे. मोदी आणि फडणवीस यांच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा विश्वास दाखवला आहे. जनतेनेच राऊतांना राजकीयदृष्ट्या पांगळं केलं आहे. पंतप्रधान मोदी हे देशाचा आधारस्तंभ आहेत. मोदींच्या नेतृत्वात देश प्रगतीपथावर गेला आहे. सलग तीन वेळा जनतेने त्यांना पंतप्रधानपदी निवडून दिलं, हेच त्यांच्या कार्याचं मोठं प्रमाण आहे. मोदी सरकारने महिलांना सन्मान देण्यासाठी विधेयक आणले, मात्र त्याला विरोध करून नारी शक्तीचा अपमान करण्यात आला. याचा हिशेब जनता नक्कीच घेईल, असे बन म्हणाले. उत्तर दक्षिण असा वाद घालण्यापेक्षा विरोधकांनी वस्तुस्थिती स्वीकारावी, असेही ते म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून दूर गेलेल्या लोकांना हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही. राज्यात धर्मांतराच्या घटनांवर ठाकरे गट गप्प दिसतो. नाशिकमधील कॉर्पोरेट जिहादवर उबाठा काहीच बोलत नाही. उबाठाने मतपेढीसाठी कॉर्पोरेट जिहादकडे दुर्लक्ष केले आहे, असा घणाघात भाजपच्या नवनाथ बन यांनी केला.

भाजप कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही. पण अफझल खानाच्या विचारांचा विरोध करतो. देशासाठी योगदान देणाऱ्या मुस्लिमांचा आम्हाला अभिमान आहे, मात्र राऊत जाणीवपूर्वक चुकीचा प्रचार करत आहेत, असा आरोप नवनाथ बन यांनी केला.

विधान परिषदेच्या जागेसाठी ठाकरे गटाला काँग्रेससमोर झुकावे लागत असल्याचा आरोप नवनाथ बन यांनी केला. एकेकाळचा स्वाभिमानी पक्ष आज सत्तेसाठी तडजोड करत असल्याची टीका करत त्यांनी जनतेच्या विरोधात भूमिका घेतल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे ते म्हणाले.
Comments
Add Comment

Milk adulteration in Navi Mumbai : नवी मुंबईतील महापेतून लाखो रुपयांचा भेसळ केलेल्या दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त

महापे : नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरातील पी. के. डेअरीवर धाड टाकून अन्न व औषध प्रशासनाने

ED's swift action : ऑनलाइन गेमिंग-बेटिंग प्रकरणात ईडीची धडक कारवाई

नागपूर : ऑनलाइन गेमिंग आणि बेटिंगच्या माध्यमातून कथित आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी अंमलबजावणी

Mumbai News : मुंबईत पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

मुंबई : पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीत घडली. गौतम

Pratap Sarnaik : गणेशोत्सवात स्वस्तात एसटीने गावी जाता येणार

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसटी बसच्या एकेरी गट आरक्षणावर

Devendra Fadnavis : पोलीस ठाण्यांची ‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्गवारी करणार

मुंबई : वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेऊन

Historical Letter : तब्बल २८० वर्षांपूर्वीच्या मोडी लिपीतील पत्रातून उलगडली बुंदेलखंडातील मराठ्यांची प्रशासन व्यवस्था

भोपाळ : मराठा साम्राज्याचे पेशवा बाजीरावांचे पुत्र बाळाजी बाजीराव (नानासाहेब) यांनी बुंदेलखंडातील आपले सेनापती