Ashok Kharat Kharat case : भोंदू खरात प्रकरणात दोषी कितीही प्रभावशाली असला तरी सोडू नका!

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलिसांना निर्देश; नाशिक धर्मांतर आणि ड्रग्ज प्रकरणाचाही घेतला आढावा


मुंबई : "भोंदू अशोक खरात प्रकरणात दोषी असणारी व्यक्ती कितीही प्रभावशाली असली तरी तिला सोडता कामा नये. या प्रकरणात पीडित महिलांना पूर्ण संरक्षण देऊन भक्कम पुरावे गोळा करा, जेणेकरून न्यायालयात अपराधसिद्धी (कन्व्हिक्शन) होण्यास मदत होईल", असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिले.


राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शनिवारी गृहविभागाची तातडीची आढावा बैठक घेतली. या बैठकीला पोलीस महासंचालक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, विशेष तपास पथकाचे (एसआयटी) प्रमुख आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी अशोक खरात प्रकरणासह नाशिकमधील धर्मांतर, तसेच गोरेगाव ड्रग्ज आणि परतवाडा येथील प्रकरणांचा विस्तृत आढावा घेण्यात आला.



अशोक खरात प्रकरणात पीडित महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. "पीडित महिलांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करा. हे प्रकरण न्यायालयात टिकण्यासाठी केवळ कागदोपत्री तपास नको, तर ठोस तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्यावर भर द्या. आरोपींच्या नावापेक्षा गुन्ह्याच्या गांभीर्यावर लक्ष द्या. तपास अशा पद्धतीने करा की कोणीही दोषी सुटता कामा नये. तपासाचा अंतिम उद्देश गुन्हेगाराला शिक्षा मिळवून देणे हाच असावा", असे फडणवीस यांनी बैठकीत बजावले.



धर्मांतर आणि ड्रग्ज विरोधात 'मोहीम'


नाशिकमधील आयटी कंपनीत समोर आलेल्या धर्मांतर प्रकरणाचीही मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली. "राज्यात धर्मांतराचे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. नाशिक पोलिसांनी हे प्रकरण उजेडात आणले हे अभिनंदनीय आहे, मात्र आता यातील सर्व 'पॅटर्न' आणि 'अँगल' तपासून कसून तपास करा," असे आदेश त्यांनी दिले.




गोरेगाव आणि परतवाडा प्रकरणाची गंभीर दखल


याचबरोबर गोरेगाव आणि परतवाडा येथील प्रकरणावर भाष्य करताना त्यांनी पोलिसांना आक्रमक पवित्रा घेण्यास सांगितले. "ड्रग्ज हे तरुणाईच्या भविष्याला लागलेली वाळवी आहे. त्यामुळे ड्रग्जविरोधात व्यापक मोहीम राबवा. परतवाडा प्रकरणातील पीडितांचे समुपदेशन करून त्यांना तक्रार देण्यासाठी प्रोत्साहित करा आणि यात सामाजिक संस्थांचीही मदत घ्या," असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा