Uninterrupted Power Supply : अखंड वीजपुरवठ्यासाठी राज्यात होणार ‘एआय’चा वापर

मुंबई : वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विजेची विक्रमी मागणी पूर्ण करतानाच, वीजनिर्मिती आणि पुरवठ्यात कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी आता 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'चा (एआय) आधार घेतला जाणार आहे. ऊर्जेचे नेटके व्यवस्थापन आणि तांत्रिक बिघाडांचा अंदाज घेण्यासाठी 'एआय'चा प्रभावी वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून, यामुळे राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा नवा अध्याय सुरू होणार आहे.


सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे शनिवारी आयोजित उन्हाळ्यातील 'पीक डिमांड' आणि वीज वितरण व्यवस्थेच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. उन्हाळ्याचा वाढता तडाखा आणि आगामी पावसाळा या दोन्ही ऋतूंमध्ये वीजपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता असते. ही अडचण दूर करण्यासाठी केवळ पारंपरिक पद्धतींवर अवलंबून न राहता, ऊर्जा विभागाने तंत्रज्ञानाची जोड द्यावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. विशेषतः मागणीचा अचूक अंदाज वर्तवणे, देखभाल-दुरुस्तीची कामे नियोजित करणे आणि संभाव्य तांत्रिक धोके ओळखण्यासाठी 'एआय' यंत्रणा महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


या बैठकीला ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासह टाटा पॉवर, अदानी पॉवर आणि 'बेस्ट'चे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यात सध्या रुफटॉप सौर ऊर्जेचा वापर वाढत असल्याने त्याचा मोठा फायदा वीज व्यवस्थापनात होत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. तसेच, वीजनिर्मितीसाठी आवश्यक असलेला कोळसा आणि पाणी यांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने राज्यावर विजेचे संकट ओढवणार नाही, अशी ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली.


मान्सूनपूर्व कामे युद्धपातळीवर सुरू


मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मान्सूनपूर्व देखभाल-दुरुस्तीची कामे सध्या युद्धपातळीवर सुरू असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. मात्र, ही सर्व कामे अधिक कार्यक्षमतेने करण्यासाठी आधुनिक सॉफ्टवेअर्सचा वापर अनिवार्य आहे. पावसाळ्यात झाडे पडणे किंवा तांत्रिक बिघाडामुळे होणारा खंड टाळण्यासाठी 'एआय'च्या माध्यमातून रिअल-टाइम मॉनिटरिंग करण्यावर भर दिला जाणार आहे. ग्राहकांना अखंडित वीज मिळावी यासाठी खासगी आणि सरकारी अशा सर्व वीज कंपन्यांनी समन्वयाने काम करावे, असे आदेशही यावेळी देण्यात आले.

Comments
Add Comment

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि