Amravati Crime News : मित्राची रूम, दोन मुली अन् कॅमेऱ्याचं जाळं; परतवाडा व्हायरल व्हिडिओ प्रकरणात अयान अहमदच्या 'त्या' कृत्याचा पोलिसांनी केला पर्दाफाश!

अमरावती : परतवाडा येथे सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या प्रकरणाला आता एक गंभीर वळण मिळाले आहे. या प्रकरणाच्या पोलीस तपासात केवळ व्हिडिओ व्हायरल झाले नसून, दोन पीडित मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, अमरावती शहरातील आपल्या एका मित्राची रूम त्याने काही तासांसाठी भाड्याने घेतली होती आणि तिथेच या मुलींवर अत्याचार केले. सुरुवातीला केवळ सोशल मीडियावरील गैरकृत्य वाटणाऱ्या या घटनेत आता लैंगिक शोषणाचे गंभीर गुन्हे उघड झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे. पोलीस आता या प्रकरणातील इतर धागेदोरे आणि आरोपीच्या मित्राच्या भूमिकेचा अधिक तपास करत आहेत.



शोषणाचे धक्कादायक वास्तव समोर


या प्रकरणातील मुख्य मास्टरमाईंड अयान अहमद तनवीर अहमद (१९) याच्या अटकेनंतर पोलिसांनी तपासाचा फास आवळला असून, या प्रकरणात आतापर्यंत एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अयान अहमद याच्या मदतीला असलेल्या त्याच्या चार मित्रांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या मित्रांनीच पीडित मुलींचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा प्राथमिक आरोप आहे. चौकशीदरम्यान अयानने कबुली दिली आहे की, अमरावती येथील एका मित्राच्या भाड्याच्या खोलीचा वापर करून त्याने दोन मुलींचे लैंगिक शोषण केले. हा मित्र केवळ काही तासांसाठी आपली रूम अयानला गुन्हेगारी कृत्यासाठी उपलब्ध करून देत असे. पोलिसांनी या रूम देणाऱ्या मित्रालाही ताब्यात घेतले आहे. पीडित मुली अद्याप स्वतःहून समोर आल्या नसून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र, आरोपींच्या मोबाईलमधील तांत्रिक पुराव्यांवरून या अत्याचाराची पुष्टी झाली आहे. याप्रकरणी पोलीस अजूनही काही संशयितांची चौकशी करत असून, अटकेतील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे परतवाडा आणि अमरावती परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.



अटक आरोपींची साखळी



  1. १६ एप्रिलच्या रात्रीपर्यंत पोलिसांनी एकूण ४ मुख्य आरोपींना अटक केली आहे.

  2. अयान अहमद तनवीर अहमद (१९) : मुख्य आरोपी (अत्याचार करणारा).

  3. उजेरखान इकबाल खान (२०) : व्हिडिओ डाऊनलोड करून व्हायरल करणारा.

  4. मोहम्मद साद मोहम्मद साबीर (२२) : व्हॉट्सॲपवरून व्हिडिओ शेअर करणारा.

  5. तरबेज खान तसलिम खान (२४) : व्हिडिओ प्रसारात सक्रिय सहभाग.


चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्यांची संख्या सहावर पोहोचली आहे.



४५ सदस्यांची SIT


आरोपींनी पीडित मुलींचे १८ व्हिडिओ आणि ३९ फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. या प्रकरणी ४५ सदस्यीय विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे ते संभाजीनगर २ तासांत, तर मुंबई-बंगळुरू अवघ्या ५ तासांत! नितीन गडकरींनी मांडला महामार्गांचा 'मास्टर प्लॅन'

पुणे : महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक व्यवस्था अधिक गतीमान करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

History of Ukadiche Modak : गणपती बाप्पा आणि मोदकाचं अतुट नातं! काय आहे उकडीच्या मोदकाचा पौराणिक आणि रंजक इतिहास?

मुंबई : गणेशोत्सव असो वा संकष्टी चतुर्थी, गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी 'मोदक' हा अग्रस्थानी असतो. लहानपणापासूनच

Auto Driver Marathi Test : ७ हजार ७५० रिक्षाचालक मराठी परीक्षेत नापास, ३० दिवसांची अंतिम मुदत

मराठी शिकण्यास टाळाटाळ करणाऱ्यांचे परमिट रद्द करणार मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी लागू करण्यात

Bhimashankar Accident : भीमाशंकर महामार्गावर भीषण अपघात; 2 रिक्षांना कारची धडक, 12 जण गंभीर जखमी

पुणे : श्रावण महिना, वीकेंडची सुट्टी आणि सोमवार असल्याने 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर

Pune Crime : पुण्यात रीलस्टार तरुणीचा 19 वर्षीय तरुणावर हल्ला; दोन तरुणींसह तिघांना अटक

पुणे :  पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात किरकोळ वादातून 19 वर्षीय तरुणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली

Maharashtra Weather : पावसाची प्रतीक्षा कायम! कोकण-घाटमाथा वगळता राज्यात जोरदार सरींची शक्यता कमी

मुंबई : ऑगस्टचा पंधरवडा संपत आला असतानाही महाराष्ट्रातील अनेक भागांत अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही.