Mumbai Water Cut : मुंबईत सोमवारी ५ टक्के पाणीकपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलबोगदा क्रमांक १ व जलबोगदा क्रमांक २ यांचे भरण अर्थात चार्जिंग, तसेच धुलाई अर्थात फ्लशिंग, क्लोरीनीकरण व डी-क्लोरीनीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असून यासाठी एल (कुर्ला पूर्व), एम पूर्व, एम पश्चिम, एन, एस, टी आणि ए, बी, सी, ई, एफ उत्तर, एफ दक्षिण या विभागात सोमवार, २० एप्रिल २०२६ ते सोमवार, २७ एप्रिल २०२६ या कालावधीत पाणीपुरवठ्यात ५ टक्‍के कपात करण्यात येणार आहे.


मुंबई महानगरपालिकेमार्फत पाणीपुरवठ्याकामी अमर महल (हेगडेवार उद्यान) ते वडाळा (प्रतीक्षा नगर) आणि पुढे परळ (सदाकांत धवन उद्यान) जलबोगदा १ (एएमटी-१) कार्यान्वित आहे. तसेच, अमर महल (हेगडेवार उद्यान) ते ट्रॉम्बे निम्‍नस्‍तरीय जलाशय आणि पुढे ट्रॉम्बे उच्‍चस्‍तरीय जलाशय जलबोगदा २ (एएमटी-२) हाही अविरत कार्यरत आहे. जलबोगद्याद्वारे होणा-या पाणीपुरवठ्याचे भरण (चार्जिंग), धुलाई (फ्लशिंग), क्लोरीनीकरण व डी-क्लोरीनीकरणाची कामे हाती घेण्‍यात येणार आहे. ही सर्व कामे सोमवारी २० एप्रिल २०२६ ते सोमवारी २७ एप्रिल २०२६ या कालावधीत केली जाणार आहेत.


परिणामी, मुंबई पूर्व उपनगरातील एल (कुर्ला पूर्व), एम पूर्व, एम पश्चिम, एन, एस, टी आणि मुंबई शहरातील ए, बी, सी, ई, एफ उत्तर आणि एफ दक्षिण या विभागात पाणीपुरवठ्यात ५ टक्‍के कपात लागू राहणार आहे. याची संबंधित विभागातील नागरिकांना नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्‍यावतीने करण्‍यात येत आहे.

Comments
Add Comment

ST BUS : आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती!

५५०० बसेसद्वारे ९ लाखांहून अधिक भाविक-प्रवाशांचा सुखरूप, सुरक्षित प्रवास मुंबई : ‘पंढरीची वारी’ (Pandharpur Wari) ही

BMC NEWS : दादरमध्ये मॅनहोलची जाळी चोरीचा प्रयत्न फसला, झाकण टाकले उघडे

महापालिका कर्मचारी नगरसेवकाच्या प्रसंगावधनाने त्वरीत बसवले

BMC : महापालिका मुख्यालय मुख्य आणि विस्तारीत इमारतींच्या दुरुस्तीवर पुन्हा साडेआठ कोटींचा खर्च

मुंबई : मुंबई महापालिका मुख्यालयातील विस्तारीत सहा मजल्याच्या इमारतीच्या नुतनीकरणाचे काम तब्बल १४ वर्षे सुरु

BMC : मुंबई महापालिका सभागृहातील आवाज होणार बुलंद, करावी लागणार नाही उचलाउचली!

मुंबई : मुंबई महापालिका सभागृहातील पूर्वापार चालत आलेले लटकते माईक हद्पार करून नगरसेवकांचा आवाज बुलंद

BMC News : प्रत्येक इमारतीत स्ट्रेचर जाऊ शकेल अशी लिफ्ट बंधनकारक

महापालिकेच्या डीसी रुल्समध्ये सुधारणा करण्याची भाजप नगरसेविकेची मागणी मुंबई : आपत्कालीन वैद्यकीय सेवा अधिक

Rajawadi Hospital : राजावाडी रुग्णालयात अत्यंत दुर्मिळ शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर

४६ वर्षीय महिला रुग्णाच्या गर्भाशयातून ५.५ किलो वजनाची काढली गाठ मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मानखुर्द येथील ४६