सहायक आयुक्त योगेश देसाईंवर जी उत्तर विभागाची जबाबदारी
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका प्रशासनात सहायक आयुक्तांच्या बदल्या आणि सहायक आयुक्तांना उपायुक्तपदी पदोन्नती देत प्रशसनात खांदेपालट करण्यात आली आहे. यामध्ये सहआयुक्त देविदास क्षिरसागर यांच्याकडे वित्त विभागाचा भार तर विनायक विसपुते यांच्याकडे उपायुक्त विशेष पदाचा कायम ठेवतानाच मध्यवर्ती खरेदी खात्याचा अतिरिक्त कार्यभार सोपवयात आला आहे. तर सहायक आयुक्त योगेश देसाई यांच्याकडे बी विभागासोबतच जी उत्तर विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेच्यावतीने सहायक आयुक्त मनिष वळंजू आणि सहायक आयुक्त विनायक विसपुते यांना उपायुक्तपदी पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे डि विभागाचे सहायक आयुक्त असलेल्या वळंजु यांना या उपायुक्तपदी पदोन्नती देताना त्यांच्याकडे परिमंडळ सातची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर सहायक आयुक्त विनायक विसपुते यांचीही उपायुक्तपदी पदोन्नती करण्यात आल्यानंतर उपायुक्त (विशेष) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे, तर मध्यवर्ती खरेदी खात्याचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
डोंगरी, मोहम्मद अली या भागातील अनधिकृत बांधकामे काढण्याची हिंमत दाखवणाऱ्या योगेश देसाई यांच्याकडे बी विभागाचा पदभार कायम ठेवतानाच दादर,माहिम,धारावी या जी उत्तर विभागाच्या सहायक आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे किमान दादरमधील फेरीवाल्यांसह रस्त्यांवरील अनधिकृत बांधकामांचे जंजाळे साफ होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. देसाई यांना जी उत्तर विभागात आणून फेरीवाल्यांवरील कारवाई तीव्र केली जावी अशाप्रकारची एकप्रकारे मागणी होती होती, ती मागणी आता प्रत्यक्षात साकार झाल्यामुळे देसाई आता दादर आणि माहिमकरांच्या स्वप्नांना कसा न्याय देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
उपायुक्त/सहआयुक्त
- सहआयुक्त देविदास क्षिरसागर बदलीचे ठिकाण : वित्त विभाग
- उपायुक्त संध्या नांदेडकर, बदलीचे ठिकाण : परिमंडळ पाच
- उपायुक्त विनायक विसपुते, बदलीचे ठिकाण : उपायुक्त (विशेष) अतिरिक्त कार्यभार मध्यवर्ती खरेदी खाते
सहायक आयुक्तांच्या बदली
- अलका ससाणे बदलीचे ठिकाण : सहायक आयुक्त बाजार, सी विभागाचा अतिरिक्त कार्यभार
- योगेश देसाई, बदलीचे ठिकाण : सहायक आयुक्त बी विभाग, जी उत्तर विभागाचा अतिरक्त कार्यभार
- संतोष साळुंखे, बदलीचे ठिकाण :सहायक अायुक्त डि विभाग, अतिक्रमण निर्मुलन (शहर)अतिरिक्त कार्यभार
- जितेंद्र घोराडे, बदलीचे ठिकाण : सहायक आयुक्त बी विभागाचा पूर्णकालिन कार्यभार






