Jyotiba Temple Development Plan : जोतिबा मंदिर विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्याला ‘सुप्रमा’

२५२ कोटींच्या कामांचा मार्ग मोकळा; ऐतिहासिक वारसा जपत पायाभूत सुविधांचे जाळे तयार करणार


मुंबई : दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा मंदिर परिसराचा कायापालट करण्यासाठी विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांना राज्य सरकारने सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) दिली आहे. या निर्णयामुळे दुसऱ्या टप्प्यातील १७० कोटी ४९ लाख रुपयांच्या कामांसह एकूण २५२ कोटी ९ लाख रुपयांच्या विकासकामांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नियोजन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) नुकताच निर्गमित केला असून, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत ही कामे तातडीने मार्गी लागणार आहेत.


श्री जोतिबा डोंगराचे धार्मिक महत्त्व आणि दरवर्षी वाढणारी भाविकांची संख्या लक्षात घेता, या परिसरात पायाभूत सुविधांचे जाळे विणण्यासाठी हा विस्तृत आराखडा तयार करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यात प्रामुख्याने भाविकांची सुलभता, पर्यावरण रक्षण आणि ऐतिहासिक वारशाचे जतन यावर भर देण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक २० कोटी २१ लाख रुपये खर्चून डोंगरावरील जुन्या पायवाटांची डागडुजी व रुंदीकरण केले जाणार आहे. तसेच, जोतिबा मंदिराच्या मुख्य यात्रा ठिकाणचे (सेंट्रल प्लाझा) दुरुस्ती व विस्तारीकरण करण्यासाठी १६ कोटी ३६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि गर्दीच्या नियोजनासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष, सीसीटीव्ही नियंत्रण केंद्र, पोलीस कक्ष आणि देवस्थान व्यवस्थापन कार्यालयाची उभारणी केली जाईल. ऐतिहासिक वारसा जपण्याच्या दृष्टीने शाहूकालीन ‘हुजुरवाडा’ इमारतीचे संवर्धन करून तिथे पुरातन दस्ताऐवज माहिती केंद्र उभारले जाणार आहे. विशेष म्हणजे, देवाच्या मानाच्या अश्वासाठी आणि उंटासाठी स्वतंत्र निवासाची व्यवस्थाही या प्रकल्पात समाविष्ट आहे.



सांडपाणी व्यवस्थापनासाठी मोठा निधी


डोंगरावरील पायाभूत सुविधांमध्ये सांडपाणी व्यवस्थापनासाठी १५ कोटी ३ लाख रुपये, तर कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेसाठी १० कोटी ७४ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ५ मेगावॅटचे सब-स्टेशन व सोलर प्लांट उभारण्यात येईल. भाविकांच्या निवासासाठी कम्युनिटी हॉल, प्राथमिक आरोग्य केंद्र, अन्नछत्र आणि वाहनतळांची सुविधाही विकसित केली जाणार आहे. कुशिरे ते गायमुख तलाव या पादचारी मार्गाचा विकास आणि श्री यमाईदेवी मंदिर परिसरातील सुविधा केंद्रांमुळे भाविकांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. वृक्षारोपणासह बाधित वृक्षांच्या पुनर्रोपणासाठी ५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Ritu Tawde : मुंबईच्या महापौरांनी केली जुहू समुद्र किनाऱ्याची पाहणी; स्वच्छता मोहिमेचा प्रत्यक्ष घेतला आढावा

मुंबई : उंच लाटांमुळे जुहू समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर वाहून येणाऱ्या कचऱ्याबाबत वारंवार नागरी तक्रारी

MBBS Admission Scam : MBBS प्रवेशाच्या आमिषाने १.१३ कोटींची फसवणूक; आरोपी महिलेला मुंबईतील विमानतळावर अटक

मुंबई : मुंबई किंवा पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी एका दुबईस्थित भारतीय उद्योगपती

Nasha Mukti Kendra : राज्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात नशा मुक्ती केंद्र स्थापन करा!

- मुख्यमंत्र्यांचे निर्देश; 'ड्रग्ज फ्री महाराष्ट्रा'साठी सर्व विभाग एकत्रित काम करणार मुंबई : तरुण पिढीला

Devendra Fadnavis :मागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा, जलयुक्त शिवार ३.० मध्ये प्राधान्य मिळणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जलसंधारणाची कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना निश्चित झालेल्या प्रकल्पांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून

Hotel Radha Malad : मालाडमधील हॉटेल राधाचा FDA परवाना निलंबित; किचनमध्ये उंदीर, झुरळांचा सुळसुळाट

मुंबई : अस्वच्छतेविरोधात कारवाईचा बडगा उगारत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मालाड पश्चिम येथील हॉटेल राधाचा अन्न

Nitesh Rane : राज्याच्या खोल समुद्रात होणार 'मसल फार्मिंग'

- मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा; स्थानिक मच्छिमारांना विश्वासात घेण्याचे निर्देश मुंबई : समुद्रातील