Iran-US-Israel War : अमेरिकेकडून इराणी १५८ नौसैनिक जहाजे नष्ट; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

- राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करून दिली संपूर्ण जगाला माहिती


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वरून एक मोठा दावा करत आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडवली आहे. अमेरिकन सैन्याने इराणच्या नौदलावर मोठा हल्ला करून तब्बल १५८ नौसैनिक जहाजे नष्ट केल्याचे (Iran-US-Israel War) ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे.



काय म्हणाले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ?


इराणची नौसेना आता समुद्राच्या तळाशी असून जर इराणची (Iran-US-Israel War) कोणतीही नौका अमेरिकेच्या नाकेबंदीच्या जवळ आली, तर तिला तात्काळ नष्ट केले जाईल असा इशारा ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये दिला आहे. या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी असेही स्पष्ट केले की, इराणच्या तुलनात्मकदृष्ट्या लहान जहाजांवर हल्ला केलेला नाही. इराणच्या ‘फास्ट अटॅक शिप्स’ला मोठा धोका मानत नसल्यामुळे त्यांना या हल्ल्यात लक्ष्य बनवण्यात आले नसल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. तसेच ट्रम्प यांनी असे नमूद केले की, समुद्रमार्गे होणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीवर कठोर कारवाई केल्यासारखीच ही कारवाई जलद आणि कठोर स्वरूपाची असेल. तसेच त्यांनी दावा केला की, समुद्रमार्गे अमेरिकेत येणाऱ्या ९८.२ टक्के अंमली पदार्थांची तस्करी आता रोखली गेली आहे.



दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या समुद्री व्यवहार संस्थेच्या प्रमुखांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, कोणत्याही देशाला आंतरराष्ट्रीय जलमार्गांमध्ये जहाजांची हालचाल थांबवण्याचा कायदेशीर अधिकार नाही. त्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार “निर्दोष मार्गक्रमण” हा प्रत्येक देशाचा हक्क असल्याचे स्पष्ट केले. या संपूर्ण घडामोडींमुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू झाली आहे. (Iran-US-Israel War)

Comments
Add Comment

Europe Heatwave 2026 : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! जूनमध्ये १६ हजारांहून अधिक मृत्यू; पुन्हा हीटवेव्हचा धोका

नवी दिल्ली : युरोपमध्ये यंदा तीव्र उष्णतेने मोठे संकट निर्माण केले आहे. जून महिन्यात जवळपास आठवडाभर सुरू

America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक

Indonesia Earthquake : इंडोनेशियात ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा इशारा, मोठी जीवितहानी

इंडोनेशिया : इंडोनेशियाच्या पूर्व भागातील फ्लोरेस बेटाजवळ शनिवारी पहाटे ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप (Indonesia Earthquake)

Shehbaz Sharif News : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भारताला धमकी, सिंधू पाणी करारावरून पुन्हा एकदा गरळ ओकली

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित 'यादगार-ए-फतह' कार्यक्रमात बोलताना

Major blow in the Iran conflict : अमेरिकेने गमावला ड्रोन ताफ्याचा चतुर्थांश भाग, ४५ 'एमक्यू-९ रीपर' नष्ट

इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे अमेरिके

Apache Helicopter Accident : अमेरिकेच्या अत्याधुनिक AH-64 अपाचे हेलिकॉप्टरचा भीषण अपघातात दोन पायलट्सचा मृत्यू

टेक्सास : अमेरिकेतील टेक्सास राज्यात अमेरिकन सैन्याच्या अत्याधुनिक AH-64 अपाचे अटॅक हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला.