पं. हृदयनाथ मंगेशकरांचे भाषण अन् भावविवश आशाताई

'स्वरस्वामिनी आशा' या पुस्तकाचे प्रकाशन विले पार्लेतील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात राष्ट्रीय सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या भाषणाने आशाताईं भावूक झाल्या. खान्देशची राजधानी ठाणेरे गावात ८-९ वर्षांच्या आशाताई आणि मी भाकरी, तिखट तेल या अन्नावर अनेक वर्षे जगलो. आशाताई सगळ्यात सुदृढ, मीनाताई कृश, माझा एक पाय कृश, मीनाताई, दीदी मुंबईत पण घरातली सगळी कामे आशाताईला करायला लागायची आणि मला सांभाळणे, माझे सगळे ती करायची, आईही करणार नाही, ते आशाताई करायची. काही ऋण, उपकार आपल्याला फेडता येत नाहीत, त्यातले हे ऋण आहेत, अशा शब्दात ज्येष्ठ गायक व संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी आपल्या बहिणीबद्दलचे ऋण व्यक्त केले. यावेळी आशाताई भावूक झाल्याचे पहायला मिळाले.


साडी, टिकली आणि फुलं
आशा भोसले यांच्या स्टाइलमध्ये काही गोष्टी कायम असायच्या. वेगवेगळ्या प्रकारच्या पारंपरिक साड्या, कपाळावर मोठी टिकली आणि कोणतीही हेअर स्टाइल असो त्यात फुलं माळलेली असायचीच. हा त्यांचा सिग्नेचर लूक त्यांनी देश-विदेशातील प्रत्येक मंचावर अभिमानाने सादर केला. मोत्यांच्या माळा, सोने किंवा डायमंड ज्वेलरीसोबत त्यांच्या हातात दिसणारे खास ब्रेसलेटही त्यांच्या स्टाइलचा भाग बनले.


इंदूरच्या खाद्य संस्कृतीवर विशेष प्रेम
इंदूरचे रहिवासी असलेले नातेवाईक मनोज बिनवाले यांच्या मते, आशाताईंना सिहोरच्या शरबती गव्हाच्या पोळ्या खूप आवडत होत्या आणि त्या अनेकदा इंदूरहून गहू मागवत असत. इंदूरच्या खाद्यसंस्कृतीशी त्यांचे विशेष प्रेम होते. सराफाच्या खाऊ गल्लीतील गुलाबजाम, रबडी आणि दहीवडे त्यांना खूप आवडत होते. बालपणी त्या सराफा चौपाटीला जात असत.

Comments
Add Comment

Asha Bhosle : दुसरा जन्म मिळाला तर, पुन्हा आशा भोसलेच व्हायला आवडेल का?

गायिका आशा भोसले यांना एकदा मुलाखतीमध्ये विचारलेले की, दुसरा जन्म मिळाला तर तुम्हाला आशा भोसलेच व्हायला आवडेल

Asha Bhosle : स्वरस्वामिनी आशा भोसले यांची गायन कारकीर्द आणि पुरस्कार

- आपल्या आवाजाने सात दशके चित्रपटसृष्टीवर राज्य केले. वयाच्या १० व्या वर्षी पहिले गाणे गाणाऱ्या आशा यांची गायन

अनेक दिग्गजांनी वाहिली ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांना शनिवारी (११ एप्रिल) कार्डिॲक

आशाताईंची सांगीतिक श्रीमंती!

उत्तरा केळकर ज्येष्ठ गायिका एक कलाकार म्हणून आशाताई प्रचंड थोरच, पण एक व्यक्ती म्हणून कसे जगायचे हेही

Asha Bhosle : इंडस्ट्रीतल्या स्ट्रगलचा बाहू करणाऱ्यांना आशा भोसलेंनी सुनावले 'हे' खडे बोल

जुना व्हिडीओ पुन्हा होतोय वायरल मुंबई : भारतीय संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध पार्श्वगायिका गायिका आशा भोसले यांचं

Asha Bhosle : आशा भोसलेंना मृत्यूची चाहूल? शेवटची इन्स्टा पोस्ट व्हायरल

मुंबई : जेष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वाला मोठा धक्का बसलाआहे. १२ एप्रिल २०२६ रोजी