Noida Employees Protest : पगारवाढीवरून सुरु झालेल्या आंदोलनाने घेतले हिंसक वळण; पोलिसांची वाहने उलथवून टाकली तर कंपनीवर तुफान दगडफेक सुरु

- एकाच वेळी ६ कंपन्यांतील कामगारांचे आंदोलन सुरु


उत्तर प्रदेश मधील नोएडा येथे वेतनवाढीच्या मागणीसाठी कारखाना कामगारांनी केलेल्या आंदोलनाने आज (सोमवार १३ एप्रिल) हिंसक रूप धारण केले आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, विविध औद्योगिक युनिट्समधील मोठ्या संख्येने कामगार एकत्र येत पगारवाढीच्या प्रलंबित मागणीसाठी निदर्शने करत होते. आंदोलनादरम्यान कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली. मात्र काही आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत मालमत्तेची तोडफोड केली, दगडफेक केली आणि एका वाहनाला आग लावली.


सध्या ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने परिस्थिती तणावपूर्ण असली तरी नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र पोलिसांनी कर्मचाऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फेकण्यात आल्या. ही घटना नोएडा फेज २ मध्ये घडली.



मुख्यमंत्र्यांनी दिले कडक कारवाईचे आदेश :


दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी अधिकाऱ्यांना कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. कामगारांना भडकवणाऱ्या असामाजिक घटकांविरोधात कठोर पावले उचलण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत.


 


काय म्हणाले पोलीस आयुक्त ?


पोलीस आयुक्त लक्ष्मी सिंह यांनी सांगितले की, औद्योगिक क्षेत्रात पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी कामगारांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस आवश्यकतेनुसार किमान बळाचा वापर करून शांतता राखत आहेत. कृपया कोणत्याही अफवांकडे दुर्लक्ष करा.



नोएडाच्या फेज २, सेक्टर १५ आणि ६२ मध्ये आंदोलन :


नोएडाच्या फेज २ परिसरातील स्टेट मद्रासन कंपनीबाहेर कर्मचाऱ्यांनी एका गाडीला आग लावली. सेक्टर १५ आणि ६२ मध्ये कामगारांनी गोंधळ घातला. कालच, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि औद्योगिक युनिट्सच्या प्रतिनिधींसोबतच, कामगार विभागाचे प्रधान सचिव एम. के. एस. सुंदरम यांनी बैठक घेऊन कामगारांच्या मागण्यांबाबत आश्वासन दिले होते.

Comments
Add Comment

Nari Shakti Vandan Sammelan : पंतप्रधान नरेंद्र मोदी नारी शक्ती वंदन संमेलनाच्या माध्यमातून कर्तृत्ववान महिलांशी संवाद साधणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नारी शक्ती वंदन संमेलनाच्या

Earned Leave : कर्मचाऱ्यांना सुट्यांच्या बदल्यात मिळणार पैसे

नवी दिल्ली : देशातील लाखो नोकरदारांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या नव्या लेबर कोडमुळे आता न वापरलेल्या

Asha Bhosle : स्वरस्वामिनी आशा भोसले यांना पंतप्रधान मोदींनी वाहिली खास मराठीतून आदरांजली

मुंबई : प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचे मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या

Manipur Violence : उग्रवाद्यांच्या भीषण हल्ल्यात BSF जवान शहीद, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद

मणिपूरच्या (Manipur Violence) उखरुल जिल्ह्यात शुक्रवारी (१० एप्रिल) उग्रवाद्यांच्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ)

Supreme Court : 'मतदान करणे आणि निवडणूक लढवणे हे मूलभूत अधिकार नाहीत'

नवी दिल्ली : मतदानाचा अधिकार किंवा निवडणूक लढवण्याचा अधिकार यांपैकी कोणताही अधिकार हा 'मूलभूत अधिकार' नाही, असे

Ahmedabad Dosa Batter Death : डोसा पीठ प्रकरणात नवीन खुलासा, मुलींच्या मृत्यूपूर्वी आईने उंदीर नाशकाची केली होती खरेदी

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबाद शहरातील चांदखेडामध्ये राहणाऱ्या प्रजापती कुटुंबातील २ चिमुकल्या बहिणींचा