Crude Oil : जागतिक बाजारात खळबळ! होर्मुज तणावाचा परिणाम; कच्च्या तेलाचे दर १०४ डॉलरच्या पुढे, जागतिक बाजार हादरला

मुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवर दिसू लागला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा निष्फळ ठरल्याने तसेच होर्मुज सामुद्रधुनीत नाकेबंदीची शक्यता निर्माण झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर झपाट्याने वाढले आहेत.


सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात ब्रेंट क्रूडचा दर सुमारे ८ टक्क्यांनी वाढून १०४ डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेला. तर यूएस बेंचमार्क वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) क्रूडमध्येही ८.६ टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली. सध्या ब्रेंट क्रूड सुमारे १०२.३ डॉलर प्रति बॅरल, तर WTI क्रूड १०४.२ डॉलर प्रति बॅरल या पातळीवर व्यवहार करत आहे.



अमेरिकेने होर्मुज सामुद्रधुनीकडे जाणाऱ्या जहाजांवर निर्बंध घालण्याचे संकेत दिल्यानंतर बाजारात अनिश्चितता वाढली आहे. होर्मुज हा जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग असल्याने येथे कोणतीही अडचण निर्माण झाल्यास त्याचा थेट परिणाम जागतिक पुरवठ्यावर होतो.


तज्ज्ञांच्या मते, परिस्थिती पुन्हा संघर्षविरामापूर्वीच्या पातळीवर पोहोचत आहे. इराण दररोज सुमारे २ दशलक्ष बॅरल तेल निर्यात करत होता. मात्र, होर्मुज मार्ग बंद झाल्यास खाडीतील देशांच्या निर्यातीवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जागतिक स्तरावर तेलटंचाई आणि दरवाढीचा धोका वाढला आहे.

Comments
Add Comment

Mukhyamantri Sahayata Nidhi : रुग्णांसाठी मोठा दिलासा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेत लवकरच होणार 'हे' बदल

मुंबई : मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षासाठी आता ऑनलाईन प्रणाली सुरू करण्यात येणार

Hardik Pandya : मुंबईच्या पराभवाची हॅट्रिक; हार्दिक पंड्याच्या कॅप्टनशीवर दिग्गज खेळाडूंसह चहुबाजुंनी टीका

मुंबई : RCB ने वानखेडेच्या ऐतिहासिक मैदानावर दमदार खेळ करत Mumbai Indians ला १८ धावांनी पराभूत केले. या पराभवामुळे मुंबई

Kalyan-Ahilyanagar Highway Accident : कल्याण अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार तर एक गंभीर जखमी

कल्याण-अहिल्यानगर (Kalyan-Ahilyanagar Highway Accident) महामार्गावर आज म्हणजेच सोमवार १३ एप्रिल रोजी अत्यंत भीषण अपघात घडला. या अपघातात

उबाठा आमदार पुत्राचे संस्कार, माजी उपमहापौरांना बसवले मागच्या रांगेत

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेत उबाठाचे आमदार सुनील प्रभू यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्तांसोबत

Asha Bhosle Funeral : आशा भोसले यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज; वाहतुकीत होणार महत्त्वाचे बदल

- शिवाजी पार्क स्मशानभूमीत आज अंत्यसंस्कार, मुंबईत कडेकोट बंदोबस्त मुंबई : भारतीय

Gold and silver prices : इराण-अमेरिका तणाव वाढला; सोन्या-चांदीच्या दरात मोठी चढ-उतार

मुंबई : पाकिस्तानच्या इस्लामाबाद (Islamabad) येथे झालेली इराण (Iran) आणि अमेरिका (America) यांच्यातील शांतता चर्चा निष्फळ