उबाठा आमदार पुत्राचे संस्कार, माजी उपमहापौरांना बसवले मागच्या रांगेत

मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबई महापालिकेत उबाठाचे आमदार सुनील प्रभू यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्तांसोबत घेतलेल्या बैठकीत चक्क उपमहापौरांने मागे बसवले. मात्र,एका बाजुला ज्येष्ठ नगरसेवक असलेले आणि उपमहापौरपद भूषवलेले ऍड सुहास वाडकर यांना मागच्या खुर्चीवर बसवतानाच आमदार पुत्र नगरसेवकाने मात्र पहिल्या खुर्चीवर बसवून आपले संस्कार दाखवून दिले आहेत. विशेष म्हणजे माजी उपमहापौर मागच्या खुर्चीवर असलेले असताना आणि आपला मुलगा जो प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आला ते पहिल्या खुर्चीवर बसलेला असतानाही आमदार सुनील प्रभू यांनीही लक्ष दिले नाही.


त्यामुळे आमदार आपल्या मुलाला अधिक प्रमोट करण्यासाठी निष्ठावान आणि ज्येष्ठ नगरसेवकांकडे दुर्लक्ष करत आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे खरोखरच पाण्याच्या समस्येबाबत बैठक होती की मुलाची अतिरिक्त आयुक्तांसोबत ओळख करून देण्यासाठी तसेच त्यांना सहकार्य करण्याच्या सूचना देण्यासाठी ही बैठक होती असाही सवाल उपस्थित होत आहे.


दिंडोशी मधील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून भेडसावणाऱ्या पाणी टंचाई, दूषित पाणीपुरवठा आणि कमी दाबाने येणारे पाणी या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उबाठा आमदार सुनील प्रभू यांनी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्यासोबत विशेष बैठक आयोजित केली होती.


यावेळी बैठकीत युवासेना कार्यकारणी सदस्य व नगरसेवक अंकित प्रभू, नगरसेवक तुळशीराम शिंदे, माजी उपमहापौर व नगरसेवक सुहास वाडकर, नगरसेविका योगिता कदम, विधानसभा संघटक प्रशांत कदम, उपविभागप्रमुख प्रदीप निकम, शाखाप्रमुख मोहन परब, रमेश कळंबे, रामचंद्र पवार यांच्यासह महानगरपालिकेचे संबंधित वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


परंतु महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसोबत पाण्यासह विभागातील विविध विषयांबाबत बैठक घेताना आपल्या पक्षाचे माजी उपमहापौर तसेच ज्येष्ठ नगरसेवक असलेले ऍड सुहास वाडकर यांना मागच्या खुर्चीवर बसवण्यात आल्याचे छायाचित्रातून दिसून येत आहे. महापालिका मुख्यालयात ही बैठक असल्यामुळे आमदारांनी माजी उपमहापौरांनी पुढे बसवून आपल्या नगरसेवक मुलाला मागे बसवण्याची सूचना करणे आवश्यक होते. तसेच प्रभू यांनी तसे केले नाही आणि त्यांचे पुत्रे अंकित यांनी उपमहापौरांऐवजी आपणच पुढे बसून आपले संस्कार दाखवून दिले.


सुनील प्रभू हे महापालिकेत निवडून आल्यानंतर त्यांनी सभागृहाचे कामकाज न्याहाळून तसेच सभा शास्त्र समजून घेण्यावर भर दिला होता. परंतु त्यांच्याकडील विषय मांडण्याची हातोटी तसेच वक्तृत्व पाहून तत्कालिन सभागृहनेते दिगंबर कांडरकर यांनी त्यांना संधी देत पुढे आणले आणि त्याच जोरावर सुनील प्रभू यांनी सभागृहनेते तसेच महापौरपद भूषवले होते. परंतु, प्रभू यांचे पुत्र अंकित यांच्याकडून वरिष्ठांचा सन्मान राखला जात नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. महापालिका सभागृहात विरोधी पक्षनेते आणि सभागृहनेत्यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवल्यामुळे त्यांच्या हाताला पकडून ते सध्या हवेतील झोके घेत असल्याचेही बोलले जात आहे.

Comments
Add Comment

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा

Mantralay : मंत्री कार्यालयातील ‘उसनवारी’ आणि ‘मौखिक’ नेमणुका रद्द, १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात परतावे लागणार; मुख्य सचिवांचे आदेश

मुंबई : विहित नियम आणि कायदेशीर प्रक्रिया डावलून मंत्रालयीन विभागांत तसेच मंत्र्यांच्या कार्यालयांत बाह्य

Basic Marathi : रिक्षा-टॅक्सी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी आणखी कालावधी मिळणार

मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी चालविणाऱ्या अमराठी चालकांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी व्यावहारिक मराठी